
करमाळा | माजी राज्यमंत्री स्व. दिगंबर बागल यांचे चिरंजीव दिग्विजय बागल हे २०२४ मध्ये शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र मोठ्या फरकाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. रश्मी बागल यांना जनतेने स्वीकारलं नाही. त्यानंतर दिग्विजय बागल यांनी राजकारणात एन्ट्री केली आणि पहिल्याच निवडणुकीत युतीतून निवडणूक लढवली पण शरद पवार गटाचे नारायण पाटील आमदार झाले.
अनेक कारणांमुळे बागल हे बॅकफूवर गेलेले आहेत. माञ दिग्विजय बागल यांनी लढविलेल्या निवडणुकीमुळे ते पुन्हा एकदा रेसमध्ये आले आहेत. टार्गेट २०२९ लक्षात ठेऊन तालुक्यातील गट पुन्हा ॲक्टिव करण्यासाठी सध्या ते धरपड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माञ २०२९ ची निवडणूक त्यांच्यासाठी अवघड जाणार असल्याचे मत राजकीय तज्ञ सांगतात.
बागल यांच्या कारखान्यातील शेतकऱ्यांची थकलेली बिले, आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवताना आलेले अपयश तसेच या पक्षातून त्या पक्षात जाऊन ऐन निवडणुकीत प्रवेश करून मिळविलेली तिकिटे हि मूळ कारणे त्यांना पराभवकडे घेऊन गेली आहेत. माञ या चुका दुर्लक्ष करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर पराभव निश्चित मानला जातोय.
त्यामुळे बागल यांना या मूळ चुकांकडे दुर्लक्ष न करता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची बिले देऊन कारखाने सुरळीत चालवणे गरजेचे आहे. तसेच तालुक्यातील गट बांधणी करून प्रामाणिक पणे राजकारण केल्यानंतर जनता २०२९ ला त्यांना रेसमध्ये अनु शकते. माञ या गोष्टीकडे लक्ष देऊन राजकारणात कमबॅक करण्याची संधी दिग्विजय बागल यांना मिळाली आहे.