
मुंबई | 2014 साली राज्यात भाजपचे सरकार आले, आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली. त्यावेळी अरोग्यादुत मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची संकलपणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मांडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा कक्ष सुरू केला.
आणि हजारो रुग्णाचे प्राण वाचविण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून केले. राज्यातील महत्त्वाकांक्षी योजना म्हणून या कक्षाकडे पाहिले जात आहे. आता पर्यंत 500 हून अधिक कोटी निधी या योजनेच्या माध्यमातून वाटप करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक फायदा या योजनेच्या माध्यमातून मिळत आहे.
दुर्धर म्हणजेच गंभीर आजारांसाठी या योजनेतून मदत मिळविता येते त्यात कॅन्सर, मेंदुरोग, अवयव प्रत्यारोपण, नवजात बालके, सर्पदंश, भाजलेले रुग्ण आणि इतर आजारांसाठी या योजनेच्या माध्यमातून मदत मिळविता येते. त्यामुळे याचा थेट फायदा रुग्णांना होतो. ऑनलाईन अर्ज करून रुग्ण या योजनेतून मदत मिळवू शकतात.
या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे – विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण आणि नातेवाईकांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आजाराच्या संबंधित रिपोर्ट, आमदार किंवा खासदार यांचे शिफारस पत्र, अवयव प्रत्यारोपण असल्यास NOC, अपघात असल्यास FIR किंवा MLC रिपोर्ट, पासपोर्ट फोटो. ई.
अर्ज कसा करावा – योजना सुरू झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी मंत्रालयात जाऊन अर्ज करावा लागत होता. मात्र २०२२ साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या कक्षाची जबाबदारी मंगेश चिवटे यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर सर्व प्रोसेस ऑनलाईन पद्धतीत पार पडते. वरील डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन करून aao.cmrf-mh@gov.in या मेलवर पाठवावित. काही असल्यास आल्यास गणेश चव्हाण (वैद्यकीय सहाय्यक) – 9307892336