राज्यातील महत्त्वाकांशी ठरलेली मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजतून मदत कशी मिळवावी? | How To Apply Chief Minister Medical Relief Fund

0
48

गणेश चव्हाण, मुंबई | महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची संकल्पना मंगेश नरसिंह चिवटे (Mangesh Chivate) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे मांडली. फडणवीस यांनी संकल्पना कायद्याच्या कचाट्यात बसवून सुरू केली. मात्र सुरुवातीला या योजनेतून अडीच वर्षात फक्त अडीच कोटी निधी वितरित करण्यात आला. आणि ही योजना मृताअवस्थेत पडली.

त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री होताच त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला (Chief Minister Relief Fund) नवसंजीवनी दिली आणि मूळ संकल्पना मांडणारे मंगेश चिवटे (Cm Osd Mangesh Chivate)  यांच्यावर कक्षप्रमुख म्हणून जबाबदारी दिली. मंत्रालयाच्या (Mantralay) सातव्या मजल्यावर हा कक्ष आहे. या कक्षाच्या माध्यमातून अवघ्या काही महिन्यात २८५ कोटीहून अधिक मदत रुग्णांना वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (Chief Minister Medical Relief Fund) मदत मिळविण्यासाठी कोणत्याही रुग्णाला मंत्रालयात जाण्याची आवशकता नाही. रुग्ण घरी बसून कागदपत्रांची पूर्तता करुन मदत मिळवू शकतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अधिकृत मेलवर कागदपत्र स्कॅन करुन पाठवल्यानंतर अवघ्या काही दिवसात रक्कम रुग्णालयाच्या खात्यात वर्ग केली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेतून मदत मिळविण्याची पूर्ण प्रक्रिया निःशुल्क आहे.

तसेच या योजनेत रुग्णालय अंगीकृत करणे देखील पूर्णपणे निःशुल्क आहे. राज्यातील सर्वाधिक महत्वाकांशी योजना म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे पाहिले जाते. दिवसेंदिवस या योजनेत अनेक बदल करुन जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा झाला पाहिजे यासाठी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे (Cm Osd Mangesh Chivate) हे काम करत असताना पाहायला मिळत आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचे निकष म्हणजे तुमच्याकडे असलेले रेशन कार्ड, पिवळे किंवा केशरी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच तुमच्याकडे १ लाख ६० हजार रुपयांच्या आत मधील तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला असणे आवशक आहे. या दोन महत्त्वाच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे (Chief Minister Medical Relief Fund Document List) – १) रुग्णाचे आणि अर्जदाराचे आधारकार्ड, २) पासपोर्ट साईझ फोटो, ३) रेशन कार्ड, ४) उत्पन्नाचा दाखला, ५) रुग्णालयाचे कोटेशन, ६) विहित नमुन्यातील अर्ज, ७) अर्ज आणि कोटेशनवर सिव्हिल सर्जन यांचा सही शिक्का, ८) अवयव प्रत्यारोपण असेल तर NOC ९) अपघात असेल तर FIR, १०) आमदार किंवा खासदारांचे शिफारस पत्र

या आजारांसाठी होते मदत (Chief Minister Medical Relief Fund) – मेंदूरोग, कर्करोग, हृदयविकार, अपघात, नवजात बालके, अवयव प्रत्यारोपण, बर्न रुग्ण, सर्प दंश रुग्ण तसेच इतर दुर्धर आजार

विहित नमुन्यातील अर्ज – येथे क्लिक करा

या रुग्णालयात होते मदत – येथे क्लिक करा

मदत पाहिजे असल्यास – 9307892336

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here