पुण्यात झपाट्याने वाढणाऱ्या गीयन बारे सिंड्रोम आजाराची लक्षणे आणि घ्यावयाची काळजी

0
12
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

पुणे | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गीयन बारे सिंड्रोम हा आजार झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. या वाढत्या आजारामुळे आरोग्य विभागाच्या हालचालींना देखील वेग आला आहे. नागरिकांची काळजी घ्यावी असे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित आजार हा अतिशय दुर्मिळ आहे. ७८ हजार नागरिकांमध्ये या आजाराचा फक्त एक रुग्ण आढळतो. हा आजार कोणत्याही वयातील नागरिकांना होऊ शकतो. माञ याचे जास्त प्रमाण हे तरुणांना संक्रमित करणे आहे. या आजाराचा धोका आहे. माञ योग्य वेळी उपचार घेतल्यानंतर यातून रुग्ण पूर्णपणे बाहेर पडताना देखील पाहायला मिळत आहे.

या आजाराची मूळ लक्षणे म्हणजे हाताला मुंग्या येणं, तसेच हाताला झिणझिण्या येणं, थकवा जाणवणे, पाठ दुखणे, हाडे दुखणे, श्वास घ्यायला तसेच अन्न गिळताना त्रास होणे. हि लक्षणे या आजाराची आहेत. माञ यावर व्यवस्थित उपाय केल्यानंतर या आजाराचा धोका नसल्याचे ही सांगण्यात येत आहे.

या आजारापासून दूर राहण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्यात शिजवलेलं अन्न पदार्थ आणि कच्चे अन्न पदार्थ हे वेगवेगळे ठेवावेत. त्याच बरोबर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पाणी उकळून प्याव, परिसर स्वच्छ ठेवावं, घर देखील स्वच्छ ठेवावं, स्वतःला स्वच्छ ठेवणे, हॅण्डवॉश चा उपयोग करणे. काही जाणवत असेल तर रुग्णालयात जाऊन तपासणी करून योग्य उपचार घेणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here