
मुंबई | केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना मागील काही वर्षांपूर्वी सुरू केली आहे. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांचां आर्थिक फायदा देखील झाला आहे. आज पर्यंत या योजनेचे १८ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. पुढील १९वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे.
१९वा हप्ता पाठविण्याच्या अगोदर अपात्र शेतकऱ्यांची छाननी केली जाऊ शकते. जे शेतकरी नियमांचे उलंघन करतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही. तसेच या योजनेतून त्यांना अपात्र ठरविले जाऊ शकते. माञ तुमच्या कडून देखील अशा चुका होत असतील तर त्या टाळाव्यात.
१) ज्या शेतकऱ्याने मागील वर्षी ITR भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरविले जाऊ शकते. २) जे शेतकरी शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत माञ त्यांचे निवृत्ती वेतन हे १० हजारांच्या पुढे आहे अशा शेतकऱ्यांना देखील लाभ होऊ शकत नाही. ३) ज्या शेतकऱ्यांकडे संस्थानाची जमीन आहे त्याला देखील अपात्र ठरविले जाऊ शकते. ४) राजकारण पदावर असलेल्या व्यक्तींना देखील याचा लाभ घेता येणार नाही.