शेत जमीन विक्री खरेदी नियमात बदल? असा आहे नवीन नियम | Land Sell Purchase Rule Change In Maharashtra

0
27

मुंबई | राज्यात शेत जमीन (farm land) विक्री खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. शेत जमिनीमध्ये मुळ दोन प्रकार येतात एक बागायती जमीन आणि दुसरी जिरायती जमीन हे दोन प्रकार येतात. मात्र दोन्ही प्रकारामध्ये खरेदी आणि विक्रीचे जे नियम (farm land rules) आहेत ते वेगवेगळे आहेत. काही वर्षांपूर्वी आणि आत्ताच्या नियमांमध्ये अनेक बदल झाले आहेत. (Farm land sell Purchase rules 2024)

१ ते ५ गुंटे खरेदी विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रांताधिकारी यांची परवानगी आवशक आहे. फक्त घरकुल बांधनीसाठी, विहीर बांधणीसाठी आणि शेतरस्ता साठी ही खरेदी विक्री परवानगी प्रांतधिकारी यांच्याकडून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता ५ गुंटे पर्यंत खरेदी आणि विक्री करता येणार आहे. शासनाने हा नवीन कायदा काहीच दिवसांपूर्वी पारीत केला आहे. (Maharashtra Government Land Sell and Purchase New rules 2024)

जर राज्यात बागायती आणि जिरायती क्षेत्र खरेदी आणि विक्री करायचे असेल तर बागायती क्षेत्र किमान १० गुंटे आणि जिरायती क्षेत्र किमान २० गुंटे असणे आवशक आहे. आणि त्याखालील खरेदी विक्री आता प्रांताधिकारी यांच्या निरीक्षणाने होणार आहे. १५ मार्च रोजी शासनाने आदेश काढला आहे. त्यानंतर शासन स्तरावर याची अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे.

राज्यात तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आला होता. त्यानंतर १ ते ५ गुंटे खरेदी विक्री करणे पूर्णपणे बंद झाले होते. यामुळे छोट्या शेतकऱ्यांना याचे अनेक तोटे पाहायला मिळाले. मात्र आता नवीन आदेश आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरकुल बांधणे, शेत रस्ता करणे आणि विहीर बांधणे यासाठी हा नवीन कायदा आमलात आणण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here