या 5 लाख महिलांना लाडकी बहिण योजनेतून अपात्र ठरवलं; वाचा सविस्तर

0
13
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

मुंबई | राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील करोडो महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. त्यामुळे गरीब आणि गरजू महिलांच्या संसराला याचा मोठा हातभार लागत आहे. माञ या योजनेतील ५ लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

शासनाने योजना सुरू केल्यानंतर नियम प्रणाली लागू केली होती. माञ महिला नियमात बसत नसून देखील त्यांनी अर्ज केल्यानंतर त्या संबंधित ५ लाख महिलांना या योजनेतून अपात्र करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आज तुम्हाला नेमक्या कोणत्या महिला यातून अपात्र ठरविल्या त्याची माहिती सांगणार आहोत.

ज्या महिलांचे पती मृत्यू झाल्यानंतर त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला आहे. अशा महिलांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच रेशन कार्ड मधील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे ४ चाकी गाडी आहे. अशा महिलांना देखील या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे.

ज्या महिलांचे वय ६५ वर्षाहून अधिक आहे. अशा महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाने चालू केलेल्या नमोशक्ती या योजनेच्या पूर्व लाभार्थी महिलांना देखील या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलेले आहे. ज्या महिलांना या योजनेचा लाभ नको आहे. अशा महिलांना देखील यातून अपात्र ठरविले आहे.

या योजनेतून तब्बल ५ लाख महिलांना अपात्र ठरविले आहे. यामुळे महिला वर्गातून शासनाच्या विषयी रोष आपल्याला पाहायला मिळत आहे. येत्या काळात ही योजना पूर्ण क्षमतेने चालेल असे देखील सांगण्यात येत आहे. शिंदे सरकार मधील या योजनेने माञ अनेकांचे ओझे हलके करण्याचे काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here