पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून मिळवा ५० टक्के अनुदान; असा करा अर्ज | How To Apply Poultry Subsidy Scheme 2024

0
36

पुणे | दिवसेंदिवस खाद्य प्रेमींची आणि येत असलेल्या नवीन रेसिपीची क्रेझ वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात पोल्ट्री व्यवसाय (poultry business) देखील मोठी भरारी घेणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज (bank loan) आणि अनुदानाची (subsidy) माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. यातून शेतीला जोडधंदा (farm attach busines) म्हणून शेतकऱ्यांना अनुदान (government subsidy) दिले जाते. काही योजनांमधून तर फक्त बँकेंची हमी (bank solvoncy) घेऊन कर्ज न घेता अनुदान मिळवू शकता. केंद्र सरकार (Center government scheme) देखील या योजनांसाठी अतिउत्साही पाहायला मिळाले आहे.

जर नवीन पोल्ट्री उद्योजकांना व्यवसाय (new Poultry busines) सुरु करायचा असेल तर केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाची नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन (National livestock mission scheme) या नावाची योजना आहे. या योजनेतून पोल्ट्री व्यवसायासाठी (Poultry busines) ५० लाख पर्यंतचे अनुदान दिले जाते. अनुदानाची टक्केवारी ही ५० टक्के आहे. मंजुरीनंतर काही टप्प्यात ही रक्कम वर्ग केली जाते.

त्यानंतर नवीन उद्योजकांसाठी (businessman) शासनाने PMEGP ही योजना सुरू केली आहे. या योजनेतून अनेक उद्योगांसाठी कर्जावर अनुदान (subsidy) दिली जाते. तर या योजनेतून पोल्ट्री व्यवसायासाठी ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान उद्योजकांना दिले जाते. ही योजना जिल्हा उद्योग केंद्राच्या (Zilha udyog kendra) अंतर्गत राबविली जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्र (DIC) ला भेट देऊ शकता.

तसेच पोल्ट्री व्यवसायासाठी जिल्हा परिषदेच्या (zp Office yojana) अंतर्गत पंचायत समितीतून (panchayat samiti yojana) काही पक्षी आणि शेड बांधण्यासाठी काही अनुदान दिले जाते. मात्र प्रत्येकच जिल्हा परिषदेकडे काही मर्यादा आणि निधी संपलेला असू शकतो. पोल्ट्री शेड (Poultry shed) बांधण्यासाठी आपल्याला बँकांकडून कर्ज मंजुरी देखील मिळू शकते. यासाठी आपल्या जवळच्या नॅशनल बँकेत (Nationalist banks) जाऊन विचारणा करवी. तसेच आपल्याकडे पोल्ट्री व्यवसायाचे प्रशिक्षण सर्टिफिकेट (Certificate) असणे अत्यंत महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here