Change Rules | प्रत्येक वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आर्थिक बजेट ठेवत असते. आर्थिक संबंधातील सप्टेंबर महिन्यात बऱ्याच गोष्टीतील शेवटची मुदत देखील दिलेली आहे. या महिन्यात नागरिकांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहेत. पैशा विषयी बदलणाऱ्या नियमाबद्दल जाणून घेणे हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असते.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला LPG Gas सिलेंडर चे दर ठरवत असते. परंतु यावेळी शासनाने एक आठवडा अगोदरच या गॅस च्या दरात सुमारे 200 रुपयांनी घट केली आहे. याचा फायदा सामान्य नागरिकांना नक्कीच होत आहे. त्यामुळे व्यवसाय करत असलेल्या कंपन्या देखील सिलिंडर च्या दरात कपात करू शकतात.
सिलिंडर चे दर निश्चित –
LPG Gas म्हंजे घरात वापरल्या जाणाऱ्या गॅस च्या किमती या महिन्याच्या एक तारखेला जाहीर केल्या जातात. मात्र सरकारने सणाचे अवचित साधून नागरिकांना एक आठवडा अगोदरच गॅस किंमती 200 रुपयांनी कमी केल्या आहेत. मात्र देशात या गॅस वरील नवीन किंमत ही एक सप्टेंबर पासूनच लागू करण्यात आली आहे.
क्रेडिट कार्ड वरील अटींमध्ये बदल -(CHANGES IN CREDIT CARD TERMS ) 1 सप्टेंबर 2023 पासून बऱ्याच बँकांनी आपल्या क्रेडिट कार्ड च्या अटी मध्ये बडल केले आहेत. Axis magnis Credit card वरील अटी आणि नियम हे देखील 1 सप्टेंबर पासून बदलले गेले आहेत. अॅक्सिस बँकेच्या अधिकृत माहितीनुसार, 1 सप्टेंबर 2023 या तारखेपासून व्यवहार EDGE पॉइंट्ससाठी किंवा वार्षिक कर माफीसाठी पात्र ठरणार नाहीत. बदलेल्या नियमानुसार Axis Bank Magnus Credit कार्ड ग्राहकांना 1 सप्टेंबर 2023 पासून 1,50,000 रुपये एकूण मासिक खर्चावर प्रत्येक 200 रुपये व्यवहारावर 12 EDGE रिवॉर्ड पॉइंट्स देणार आहे.
मोफत होणार आधार कार्ड अपडेट –
UIDAI ने आता आपले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदत दिलेली आहे. दिलेल्या मुदतीमध्ये जर आपण आधार अपडेट करणार असल तर आपले आधार कार्ड हे पूर्णपणे निःशुल्क अपडेट केले जाणार आहे.
2000 हजार रुपयांची नोट बदलण्याचा शेवटचा दिवस – संपूर्ण भारतात RBI ने 2000 हजार ची नोट बदलून घेण्यासाठी सर्वानाच 4 महिन्याची मुदत दिली होती. 2000 रुपयाची नोट ही आपल्याला त 30 सप्टेंबर पर्यंत बदलून घेता येणार आहेत. किंवा आपण बँकेत त्या 30 सप्टेंबर पर्यंत जमा करू शकतो.
कॅनरा बँक ची ऑफर –
कॅनरा बँक ही 3 डोर स्टेप सेवेवर कोणतेच सेवा शुल्क आकारत नाही. ही ऑफर फक्त 31 ऑगस्ट पर्यंतच होती.
पॅनकार्ड – आधारकार्ड लिंक –
बचत खाते असणाऱ्यांना 30 सप्टेंबर पर्यंत आपले पॅनकार्ड हे आपल्याच आधारकार्ड सोबत लिंक करण्याची मुदत देण्यात आली आहे. असे जर आपण केले नाही तर आपले बँक खाते बंद केले जाऊ शकते.
D Mat E- KYC DOCUMENTS –
जे नागरिक ट्रेडिंग करत आहेत त्यांना सेबी ने आपले वांरसाचे 30 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिली आहे.
SBI ची नवीन योजना –
भारतीय स्टेट बँकेने वुई केअर योजनेची मुदत वाढवून 30 सप्टेंबर ही शेवटची मुदत दिली आहे. ही योजना जेष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येते. या योजनेमध्ये गुंतवणूक करणारे ज्येष्ठ नागरिक हे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर 7.50% व्याजदर मिळतो.