Chavan Industries Private Limited | चव्हाण इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड

0
13

स्टील उत्पादन आणि फूड उत्पादन क्षेत्रातील अतिशय विश्वसनीय कंपनी म्हणून चव्हाण इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (Chavan Industries Private Limited) या कंपनीची ओळख आहे. ही कंपनी महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आहे. मात्र कंपनी पूर्ण राज्यभर सुविधा देते.

सेंट्रिंग तसेच इतर कामांसाठी लागणारा खिळा (Wire Nail), बाइंडिंग वायर, चेन लिंक जाळी असे स्टील प्रॉडक्ट या कंपनीच्या माध्यमातून उत्पादीत केले जातात. कंपनी थेट दुकानदारांशी कनेक्ट असल्यामुळे मध्ये येणाऱ्या एजेंसीला फायदा न होता, दुकानदारांना फायदा होत आहे.

याबरोबरच चव्हाण इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (Chavan Industries Private Limited) ही कंपनी फूड व्यवसायात देखील अग्रगण्य आहे. या कंपनीच्या माध्यमातून बेसन (Flour Mill) उत्पादन केले जाते. श्री बेसन (Shree Besan) नावाने उत्पादन आहे. बाजार पेठेत या बेसनाला अधिक मागणी आहे.

या कंपनीचे मुख्य दोन डायरेक्टर आहेत. १) गणेश तानाजी चव्हाण (Ganesh Tanaji Chavan), २) तानाजी महादेव चव्हाण (Tanaji Mahadev Chavan) तसेच या कंपनीच्या माध्यमातून ४४ तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुख्य कार्यालय – वांगी नं.२ रोड, शेलगांव चौक, शेलगांव (वांगी), ता. करमाळा, जि. सोलापूर – ४१३२०२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here