मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेच्या या आहेत अटी? असा घ्या लाभ | How To Apply Mukhyamantri Ladaka Bhau Scheme

0
30

मुंबई | सरकारने रक्षाबंधनचे गिफ्ट म्हणून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (mukhyamantri ladaki bahin yojana) या अर्थसंकल्पात आणली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येकी आणि प्रत्येक महिन्याला १ हजार ५०० रुपये रक्कम दिली जाणार आहे. सरकारने (Maharashtra government scheme) काही निकष ठरवून दिले आहेत. त्या निकषात बसलेल्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

त्यामुळे महिला वर्गामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या योजनेचा (Government Scheme) पहिला हप्ता हा रक्षाबंधन ला महिलांच्या खात्यावर वर्ग केलाजाऊ शकतो. मात्र शासनाने महिलांसाठी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीसाठी योजना आणली पण मुख्यमंत्र्यांच्या (cm) लाडक्या भावाचे काय? असा प्रश्न विरोधकांनी उचलून धरला.

आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावासाठी म्हणजेच तरुणांसाठी एका योजनेची घोषणा केली आहे. त्यामुळे तरुण वर्गात देखील आनंदाचे वातावरण पसरले आहे. राज्य शासन (maharashtra state government) सध्या ऍक्शन मोडवर पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यापासून जनसमान्यांना फायदा होईल अशा अनेक योजना आणल्या आहेत.

नेमकी योजना आहे तरी काय? मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना (mukhyamantri ladka bhau yojana) ही योजना मुळात बेरोजगार तरुणांसाठी आहे. सरकारच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण आणि अप्रेंटिसशिप दिली जाणार आहे. जे तरुण सरकारच्या निकषात बसत आहेत. अशा प्रत्येक तरूणाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

योजनेच्या नियम व अटी – १) तरुणाचे वय 18 ते 35 वर्ष असावे. २) तरुणाचे शिक्षण हे कमीत कमी १२वी पास असावे. ३) तरुण हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. ४) तरुणाचे राष्ट्रीयकृत बँकेत आधारशी सलग्नीत बँक खाते असावे. ५) अर्जदार तरुणाने उद्योजगता, कौशल्य, रोजगार आणि नाशवण्यता पोर्टलवर नोंदणी केलेली असावी. ६) तरुण अर्जदाराकडे रोजगार नोंदणी क्रमांक असणे आवशक आहे. ७) तरुण महाराष्ट्रातील अधिवास असणे आवशक आहे.

योजनेसाठी लागणारी कागदपत्र – अजदाराचे आधारकार्ड, अर्जदाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जन्मदाखला, ड्रायव्हिंग लायसन्स, आयडेंटिटी फोटो, मोबाईल नंबर, बँक पासबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here