मुंबई | सोमवारी मुंबईत होणाऱ्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत महायुतीचे तीनही शीर्षस्थ नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार माझ्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतील आणि महायुतीची उमेदवारी मलाच मिळेल असा ठाम विश्वास पुणे शिक्षक मतदारसंघातील इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे.
गेला दोन वर्षात शिक्षक बांधवांच्या प्रत्येक प्रश्नावर आपण आग्रही भूमिका घेतली असून जुनी पेन्शन योजना, प्रचलित नुसार टप्पा वाढ , शिक्षक बांधवांना आरोग्य विमा कवच योजना आदी प्रश्नांसाठी शासनदरबारी यशस्वीपणे पाठपुरावा करत असल्याचा दावा करत पुणे शिक्षक निवडणूकीत आपण लढणार आणि जिंकणार असा दावा मंगेश चिवटे यांनी केला आहे.
दरम्यान शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आपण पुणे येथे मंगळवारी सकाळी 11:00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब, आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर साहेब आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शिवसेना आमदारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल अर्ज दाखल करणार असल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले.







