Aptera Solar Car | अमेरिकेतील एका नामांकित कंपनीने सूर्यप्रकाशावर चालणारी कार बनवली असल्याचे वृत्त सध्या समोर आले आहे. अमेरिकेतील नामवंत वृत्त वाहिन्यांनी याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे, इलेक्ट्रिक कार तर आल्याच होत्या मात्र थेट सूर्याच्या किरणावर चालणारी कार देखील अमेरिकेने समोर आणली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात ही कार धुमाकुळ घालणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कार लाँच होण्याच्या अगोदरच तब्बल ५० हजार लोकांनी या कारचे बुकिंग देखील केले आहे. त्यामुळे या कारमध्ये काही विशेषता असणार आहे.
देशामध्ये डिझेल गाड्यांवर हळूहळू बंदी घातली जात आहे. दिल्ली सरकारने देखील बंदी घातली आहे. वाढते प्रदूषण पाहता डिझेल वाहनाच्या संदर्भात अनेक निर्णय सध्या शासनाच्या माध्यमातून घेतले जात आहेत. पेट्रोलचे देखील दर आभाळाला भिडले आहेत, त्यामुळे पेट्रोल वाहने चालविणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांच्या बजेटच्या बाहेरचा विषय होऊ लागला आहे. त्यामुळे देशात इलेक्ट्रिक कारला चांगलेच महत्त्व आल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक नागरिक इलेक्ट्रिक कार खरेदी करून प्रदूषण आणि खर्च वाचवत आहेत.
मात्र अमेरिका यापुढच्या गोष्टी विचारात घेत आहे, इलेक्ट्रिक सोबत सूर्याच्या किरनाणे चालणाऱ्या गाडीचे निर्माण करत आहे. गेल्या १० वर्षापासून अमेरिकेतील एका नामांकित गाडी बनविणाऱ्या कंपनीने हे निर्माण सुरू केले आहे. सध्या हे वाहन बाजारात येण्यासाठी अवघे काही महिने लागणार आहेत. ही कार अमेरिकेत लाँच झाल्यानंतर भारतात देखील येऊ शकते? किंवा भारतातील नामांकित कंपन्या तशा प्रकारच्या गाड्या बनवू शकतात.
READ MORE – फक्त २ लाखात घरी आणा TATA SIERRA, जाणून घ्या कॅलक्युलेशन
या गाडीच्या महत्वाच्या टेस्ट सध्या सुरू आहेत, या वर्षाच्या अखेर या टेस्ट संपल्यानंतर ही गाडी मार्केटमध्ये येणार आहे. त्यामुळे या गाडीची जगामध्ये जास्त क्रेझ पहायला मिळणार आहे. या गाडीमध्ये फिचर्स भरपूर देण्यात आले आहेत. ही गाडी सूर्यप्रकाशावर तब्बल ३८ किलोमीटर जाणार आहे. तसेच या कारची बॅटरी पूर्ण चार्जिंग केल्यानंतर ही गाडी तब्बल ६४३ इतकी जाणार आहे. या गाडीची किंमत अद्याप कंपनीने सार्वजनिक केलेली नाही. मात्र लवकरच कंपनी किंमत जाहीर करू शकते.
सदर कंपनी ही पुढील काळात या गाडीचे पुढच मॉडेल १६०० किलोमीटर रेंज देईल असे बनवत आहे. २००७ रोजी या गाडीच्या निर्मानास कंपनीने सुरुवात केली होती. त्यानंतर आता या गाडीचे सर्व कामकाज कंपनीने पूर्ण केले आहेत. आणि लवकरच या गाडीचे डिटेल्स मिडियामध्ये प्रकाशित केले जाणार आहेत. सध्या ५० हजारहून लोकांनी या कारचे pre-booking केले आहे. त्यामुळे येत्या काळात ही कार चांगलीच क्रेझ मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतातील स्पोर्ट्स कार प्रमाणे या कारचे बाहेरील लुक आहे. त्यामुळे पाहता क्षणी चाहते बुकिंग करत आहेत. भारतामध्ये देखील या प्रकारची कार लवकरच आपल्याला पाहायला मिळू शकते. भारतातील काही कंपन्या अशा कार बनविण्यासाठी सध्या अभ्यास करत आहेत. मात्र ही कार बाजारात आल्यानंतर भारतात येण्यासाठी जास्तकाळ जाणार नाही. या कारच्या छतावर सोलर सिस्टम लावण्यात आले आहे, त्यामुळे सूर्यप्रकाशात गेल्यानंतर ही आपोआप चार्जिंग होणार आहे. याची बॅटरी लिथेनियम पासून बनवली आहे. त्यामुळे बॅटरी हेल्थ दीर्घकाळ चांगली राहू शकते.
FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Aptera Solar Car)
ही कार कधीपर्यंत लाँच होईल?
उत्तर – ही कार २०२६ एंडिंग पर्यंत लाँच होऊ शकते.
ही कार भारतात येऊ शकते का?
उत्तर – हो, येऊ शकते.
ही कार पूर्णपणे सोलारवर चालते का?
उत्तर – नाही, सोलर आणि चार्जींवर चालते.
या कारची किंमत किती असेल?
उत्तर – कंपनीने अधिकृत जाहीर केले नाही.
कोणत्या देशाने कार बनवली आहे?
उत्तर – अमेरिकेतील एका कंपनीने या कारचे निर्माण केले आहे.
कंपनीचे नाव काय आहे?
उत्तर – अमेरिकेतील Aptera Motors कंपनीचे नाव आहे.
भारतात या कारची किंमत किती असेल?
उत्तर – माहित नाही, आल्यानंतर समजेल








