Cibil Score Increase 2026 | सध्या चालू युगामध्ये सिबिल स्कोअर ला मोठ महत्व आले आहे. पहिल्या काही वर्षांमध्ये सिबिल स्कोअर ला म्हणावे असे महत्व नव्हते मात्र सध्याच्या काळात याला मोठ महत्व आले आहे. दैनंदिन जीवनात जगताना अनेक गोष्टींमध्ये याची गरज भासू लागली आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दैनंदिन जीवनातील अशा बऱ्याच गोष्टींसाठी हा स्क्रोअर चांगला असणे महत्वाचे आहे.
आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून क्रेडिट स्कोअर कसा पटकन वाढवायचा याची सविस्तर माहिती देणार आहोत. अनेक लोकांचे कोरोना महामारीमध्ये क्रेडिट स्कोअर डाउन झाला, त्यांना त्यामुळे आता बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र या लेखातून तुमचा जुना सिबिल स्कोअर कसाही असूद्या टिप्स फॉलो केल्या तर नक्की वाढेल. आणि तुम्हाला बँकेत घेतल्यानंतर सन्मानाने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
(how to increase credit score fast, credit score improvement tips)
बँकेत लोन घ्यायचे असेल किंवा साधारण एखादा स्मार्टफोन जरी खरेदी करायचा असला तरी संबंधित बँक किंवा फायनान्स तुमचा स्कोअर तपासते आणि त्याच्या आधारावर तुम्हाला कर्ज वितरण किंवा वस्तूंवर लोन करून दिले जाते. मात्र याच वेळी जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर एकतर तुमचे कर्ज नामंजूर केले जाते, किंवा जास्तीचा व्याजदर लावून कमी प्रमाणात कर्ज दिले जाते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजदरावर जास्तीचे कर्ज दिले जाते.
(loan approval credit score, credit score check india)
जाणून घेऊया तुम्ही कोणत्या टिप्सने तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली बनवू शकता.
- क्रेडिट कार्ड – Credit Card Usage for Better Credit Score.
अनेकजण दैनंदिन वापरासाठी क्रेडिट कार्डचा उपयोग करतात, पेट्रोल पासून किराणा घेण्यापर्यंत क्रेडिट कार्ड वापरले जाते. मात्र क्रेडिट कार्डमुळे देखील तुमचा स्कोअर कमी होतो हे अनेकांना माहित नसते. जर तुमच्या क्रेडिट कार्डचे लिमिट १ लाख रुपये आहे आणि तुम्ही जर पूर्ण १ लाख वापरले तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. कारण तुमच्याकडे पैशांच नियोजन नसल्याचे यावरून जाणवते. त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या कार्ड लिमिट पैकी फक्त ४० टक्के अमाउंट तुम्ही खर्च करा. म्हणजे लिमिट जर १ लाख असेल तर फक्त ४० हजार रुपये त्यावरून खर्च करा म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहील.
(credit utilization, credit card spending tips)
जर तुम्हाला त्यांच्या क्रेडिट कार्डवरून जास्त पैसे स्पेंड करायचे असतील तर तुम्ही मल्टिपल कंपन्यांचे कार्ड वापरा, उदा. तुम्हाला जर १ लाख रुपये वापरण्यासाठी लागत असतील तर एका कार्डवरून न वापरता. ३ कंपन्यांच्या कार्ड वरून पेमेंट करा. म्हणजे तुमच्याकडे जर तीन कार्ड असतील तर प्रत्येक कार्डवरून ३३ हजारांपेक्षा जास्त रक्कम वापरा. यातून तुमचा स्कोअर सेफ राहीलच आणि तो वाढेल देखील.
(multiple credit cards strategy)
- कर्ज – Loan EMI and Credit Score
तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होण्यामागे सर्वात जास्त मोठा मुद्दा म्हणजे घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. जर तुम्ही घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत गेले नसतील तर आणखी वेळ गेलेली नाही असा निश्चय करून तुम्ही जुने हप्ते भरा. आणि राहिलेली रक्कम वेळेत भरा, याने तुमचा खराब झालेला स्कोअर हळूहळू रिकवर होईल. आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही घेतलेल्या कर्जाचा हप्ता मोठा असेल आणि तो तुम्हाला भरायला अवघड जात असेल तर तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतलय त्या बँकेत जावा.
मी हे कर्ज घेताना माझी आर्थिक स्थिती मजबूत होती, मात्र सध्या माझी आर्थिक स्थिती चांगली नाही. मला हे कर्ज नियमित फेडायचे आहे मला हप्ता कमी करून द्या. अशी विनंती आणि अर्ज बँकेला करा. बँक तुमचे कर्ज रिस्ट्रक्टचर करेल यामुळे तुमच्या हप्त्याची रक्कम कमी होईल आणि तुमच्यावर ताण येणार नाही. कमी झालेली हप्त्याची रक्कम नियमित भरा. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअर मध्ये चांगली सुधारणा होईल.
(loan restructuring, emi management)
- क्रेडिट कार्ड – Credit History Length
तुमच्याकडे जर जून क्रेडिट कार्ड असेल तर ते बंद करू नका कारण तुमच्या जुन्या क्रेडिट हिस्ट्री मुळे तुमचा स्कोअर मजबूत राहतो. त्याचप्रमाणे तुम्ही जास्त क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू नका, त्यामुळे तुमच्या स्कोअर वर inquiry दिसते आणि तुमचा स्कोअर कमी होतो. त्यामुळे जास्त कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करू नका. बँकांकडून Pre Approved ऑफर येण्याची वाट पहा. जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर अनेक कंपन्या मागे लागून तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरायला देतात.
त्याचप्रकारे तुम्ही एकावेळी अनेक कंपन्यांकडे कर्जाची मागणी करू नका, काही बँकांने कर्ज नाकारले तर Cibil ब्युरो ला तुमच्यावर संशय येतो. आणि तुमचा क्रेडिट स्कोअर ऑटोमॅटिक कमी होत जातो. त्यामुळे जेवढ्या inquiry कमी असतील तेवढं तुमच्या स्कोअर मध्ये बदल पाहायला मिळतील. तुमचे क्रेडिट स्कोअर अकाउंट कायम क्रेडिट मिक्स ठेवा म्हणजेच जर तुमच्याकडे २ क्रेडिट कार्ड असतील आणि ते तुम्ही वापरत असाल तर त्याच्या सोबत एखाद छोट मोठ कर्ज असणे खूप महत्वाचे आहे. क्रेडिट मिक्समुळे तुमचा स्कोअर चांगलाच वाढतो.
(credit mix benefits)
जर तुमची अनेक बँकांमध्ये saving account असतील आणि ती account तुम्ही वापरत नसाल तर बंद करा. कारण तुमच्या अकाउंट मध्ये मेन्टेन बॅलन्स राहत नसल्यामुळे बँका तुमचा डेटा Cibil ब्युरो ला पाठवतात आणि यावरून तुम्ही आर्थिक अडचणीत असल्याचे निदर्शनात येते. त्यामुळे तुम्ही use करत नसलेली खाती तात्काळ बंद करा, यानंतर हळूहळू तुमचा स्कोअर सुधारू शकतो.
READ MORE – उपचार घेण्यासाठी पैशांची चिंता सोडा, गंभीर आजारांसाठी शासन करतय अर्थसहाय्य
क्रेडिट स्कोअर बद्दल महत्वाची माहिती
तुम्ही जर कोणत्या एजंट कडे तुमची काही कागदपत्र दिली असतील तर सावधान कारण एजंट तुमची फाईल अनेक बँकांकडे लॉगिन करतात आणि यामुळे तुमच्या सिबिल स्कोअर वर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ज्या ज्या एजंट कडे तुम्ही कर्ज काढण्यासाठी फाईल दिली असेल त्यांच्याकडून ती परत घ्या किंवा त्यांनी लॉगिन करताना येणारा प्रत्येक otp त्यांना देऊ नका. यामुळे तुमच्या स्कोअर वर बराच परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारत देशामध्ये क्रेडिट स्कोअर ३०० ते ९०० मध्ये मोजला जातो. खालील प्रमाणे स्कोअरची कोणती स्थिती चांगली आणि कोणती खराब हे जाणून घेऊ
| RANGE | LEVAL |
| ७५० ते ९०० | Excellent Credit Score |
| ७०० ते ७४९ | Good Credit Score |
| ६५० ते ६९९ | Average Credit Score |
| ६०० ते ६४९ | Risky Credit Profile |
| ३०० ते ५९९ | Poor Credit Score Not accept bank |
खालील लिंकवर जाऊन तुमचा क्रेडिट स्कोअर चेक करत जावा.
| CIBIL | CHECK NOW |
| Experian | CHECK NOW |
(free credit score check india)









