CMRF Sarkari Yojana: उपचार घेण्यासाठी पैशांची चिंता सोडा, गंभीर आजारांसाठी शासन करतय अर्थसहाय्य

Medical Help Scheme Maharashtra

February 23, 2026 3:23 PM

Maharashtra Sarkari Yojana | गंभीर आजाराची लागण झालीय मात्र दवाखान्यात उपचार घेण्यासाठी पैशांची कमतरता आहे. यामुळे अनेक सामान्य नागरिक उपचाराभावी उपचार घेत नाहीत. आणि यामुळे त्यांचा जीव देखील जातो. पण महाराष्ट्र सरकारच्या एका योजनेमुळे अनेक रुग्णांना मोठ अर्थसहाय्य मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक गंभीर शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाने २०१४ रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या योजनेची सुरुवात केली. आणि या योजनेतून हजारो रुग्णांना लाभ मिळवून दिला. चांगले आणि लक्जरी हॉस्पिटल या योजनेच्या पॅनलवर घेऊन त्या हॉस्पिटल मधील रुग्णांना या योजनेतून अर्थसहाय्याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या योजनेचे महत्व देखील वाढत आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसहाय्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. तुम्ही या योजनेचा लाभ ऑनलाइन अर्ज करून घेऊ शकता. या योजनेतून लाभ मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वशिल्याची किंवा आर्थिक देवाणघेवाण करण्याची गरज नाही. तसे कोणी आढल्यास तुम्ही त्याची तक्रार संबंधित कक्ष प्रमुखांकडे करू शकता.

लाभ कसा मिळवायचा? CMRF Sarkari Yojana
या योजनेतून लाभ मिळविण्यासाठी सर्व कागदपत्रांची एक फाईल बनवायची त्यानंतर ही फाईल मुख्यमंत्री सहायता निधीच्या मेलवर पाठवून द्यायची. फाईल पाठविल्यानंतर तुम्हाला फाईल स्टेटस जाणून घ्यायचे असल्यास एक फाईल नंबर दिला जाईल. त्या फाईल नंबर वरून तुम्ही तुमच्या अर्जाची सध्यस्थिती जाणून घेऊ शकता.

लागणारी महत्वाची कागदपत्र?
विहित नमुन्यातील अर्ज (यावर जिल्हा शल्यचिकिस्तक यांचा सही शिक्का), रुग्णालयाचे कोटेशन, रुग्णाचे आधारकार्ड, अर्ज करणाऱ्या नातेवाईकाचे आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार), रेशन कार्ड, रुग्णाची सर्व तपासणी रिपोर्ट, आमदार किंवा खासदारांचे शिफारस पत्र, रुग्ण आणि अर्ज करणाऱ्या नातेवाईकांचा पासपोर्ट साईझ फोटो

या गंभीर शत्रक्रियांसाठी आर्थिक मदत –
नवजात बालके, कर्करोग, मेंदूरोग, अपघात, डायलासिसीस, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण, कॉकलर इंप्लांट तसेच बऱ्याच आजारांवर अर्थसहाय्य केले जाते.

अर्ज कसा करावा?
वरील सर्व कागदपत्र तयार करून ते स्कैन करून घ्या. सर्व डॉक्युमेंटची पीडीएफ बनवून aao.cmrf-mh@gov.in या मेलवर पाठवून द्या. त्यानंतर तुम्हाला एक फाईल नंबर मिळेल त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची फाईल कोणत्या कामासाठी घेतलीय याचे मूळ स्टेटस समजेल.

 

Important Links –

APLICATION FORM – DOWNLOAD

HOSPITAL LIST – DOWNLOAD

STATUS CHECK – APPLY NOW

OFFICIAL WEBSITE – VIEW

अर्जाचे सध्याचे स्टेटस कसे पाहायचे?

सुरुवातीला तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटर मधील क्रोम ब्राउझर ओपन करा. त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अधिकृत वेबसाईट वर जा. वेबसाईट चे होमपेज ओपन होईल. त्यानंतर होमपेजवर वर तुम्हाला अर्जाची स्थिती हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही ज्या मेलवरून अर्ज केला आहे. त्या मेलवर तुम्हाला तुमचा फाइल नंबर आला असेल, Aplication Number च्या पुढे तो नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर म्हणून दिसेल त्या ठिकाणी तुम्ही अर्जात दिलेला मोबाईल क्रमांक टाका.

त्याच्या खाली तुम्हाला एक captcha दिसेल तो बाजूला पाहून व्यवस्थित टाकून घ्या. आणि सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती पाहायला मिळेल. जर Received अशी स्थिती असेल तर त्याचा अर्थ असा की तुमची फाईल योजनेच्या कार्यालयात पोहचली आहे. Under Process असे दिसले तर तुमची फाईल प्रोसेस मध्ये आहे. Approval Sent To Bank असे स्टेटस दिसले तर तुमची फाईल मंजूर झाली आहे.

बँकेकडे मंजूर अमाउंट तुम्ही ज्या रुग्णालयात उपचार घेत आहात त्या रुग्णालयाच्या खात्यावर रक्कम पाठविण्यासाठी फाईल गेली आहे. जर rejected म्हणून स्टेटस दिसले तर तुम्ही ज्या मेलवरून फाईल पाठवली आहे. तो मेल चेक करा. तुमची फाईल कशामुळे रिजेक्ट झाली याचे कारण तुमच्या मेलवर आले असेल. या योजनेचे रिजेक्ट होण्याची कारणे काही अशी आहेत. आजार बसत नाही, रुग्णालय मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पॅनलवर नाही.

रुग्णांचा डिस्चार्ज झाला आहे. यापैकी काही कारणांमुळे तुमची फाईल रिजेक्ट होऊ शकते. जर रुग्णाचा डिस्चार्ज झाला आहे. असे स्टेटस असेल आणि तुमचा डिस्चार्ज झाला नसेल तर तुम्ही ज्या रुग्णालयात उपचार घेत आहात त्यांच्याकडून ऍडमिट लेटर घ्या. आणि ज्या ईमेलवर तुम्ही फाईल पाठवली आहे. त्या मेलवर ते डिस्चार्ज लेटर पाठवून द्या. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाईल आणि तुमची फाईल मंजूर केली जाईल.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणजे काय?

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही महाराष्ट्र शासनाची महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना ज्यांचे दुर्धर आजार आहेत अशांना मदत केली जाते. २०१४ साली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर या कक्षाची संकल्पना मंगेश चिवटे यांनी त्यांच्याकडे मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना कायद्याच्या चौकटीत बसवून रुग्णांसाठी सुरू केली. मात्र योजना सुरू झाल्यानंतर या योजनेतून गरजूंना लाभ मोठ्या प्रमाणात मिळत नव्हता.

ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनी या कक्षाला नवसंजीवनी आणली. या कक्षाच्या कक्ष प्रमुख पदी मंगेश चिवटे यांची निवड केली. त्यानंतर हजारो गरजू गरीब लोकांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. हळू हळू राज्य शासनाची एक महत्वाची योजना म्हणून नावारूपाला आली. या योजनेतून दुर्धर आजारांसाठी निधी दिला जातो. संबंधित निधी हा रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांच्या नावाने दिला जात नाही.

तर हा निधी थेट ज्या रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहे. अशा रुग्णालयाच्या बँक खात्यात दिला जातो. त्यामुळे या योजनेतून अपहार करणाऱ्या लोकांना आळा बसला आहे. या योजनेतून मदत मिळविण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही. कारण ही योजना पूर्णपणे ऑनलाइन सुरू करण्यात आली आहे. घरी बसूनच या योजनेसाठी अर्ज करण्याची सुविधा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे मंत्रालयाला जाण्याचे हेलपाटे थांबले आहेत.

या योजनेतून लाभ घेण्यासाठी कोणत्याही दुव्याला किंवा कोणाला एक रुपया देखील देण्याची गरज नाही. कारण या योजनेसाठी कोणत्याही प्रकाराची प्रोसेसिंग फी आकारली जात नाही. मात्र तरी देखील कोणी पैसे मागत असेल तर तुम्ही त्याची तक्रार मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात पत्रव्यवहार किंवा थेट जाऊन करू शकता.

Mr. Ganesh Chavan

Ganesh Tanaji Chavan is a digital media professional and founder of Maharashtra Update. He has experience working with Pudhari Media Group and Loksatta.com, delivering reliable news, government scheme updates, and job information across Maharashtra. His mission is to provide accurate and trustworthy information to readers.

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment