फक्त २ लाखात घरी आणा TATA SIERRA, जाणून घ्या कॅलक्युलेशन

February 19, 2026 10:11 AM
---Advertisement---

 

Tata Sierra Car | सध्या भारत देशामध्ये टाटा सिएरा कारची चांगलीच क्रेझ आहे. ९० च्या दशकातील या कारने २०२६ मध्ये चांगलाच धुराळा केलाय, भल्या – भल्या SUV कारला टक्कर देऊन ५ स्टार रेटिंगसह ही गाडी मार्केटमध्ये चांगलीच धुमाकूळ घालत आहे. खिशाला परवडेल अशी ही गाडी टाटाने ग्राहकांसाठी काढली आहे. SUV फिलींग देणारी कार घेण्यासाठी नेमका महिन्याला किती उत्पन्न हवे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. Tata Sierra ही एक मिड साईज SUV कार मध्ये मोडणारी कार आहे. टाटा मोटर्सने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी ही कार खरेदीसाठी उपलब्ध करून दिली आहे. या कारची बाहेरील बॉडी ही बॉक्सी आहे. त्यामुळे या गाडीचा रोड प्रेसेंस खूप जास्त आहे. विशेष म्हणजे या गाडीला फ्लश डोअर देण्यात आले आहे, त्यामुळे स्टाईल च्या बाबतीत त्याला अनेक ग्राहकांनी पसंती दिली आहे.

गाडीच्या चाकांविषयी बोलायचे झाले तर १९ इंच आलाय व्हील देण्यात आले आहेत. त्यामुळे जेव्हा ही कार रस्त्यावरून धावते त्यावेळी ती उठून दिसते. तसेच गाडीच्या समोर स्टाइलिश LED देण्यात आले आहेत. त्यामुळे कितीही अंधार असला तरी स्पष्ट पणे समोरच दिसते. या कारच्या डैशबोर्ड कडे पहायचं झाल तर तीन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. तसेच या कारसोबत 5G कनेक्टिविटी देखील मिळणार आहे.

त्याच बरोबर टाटा मोटर्सचे iRA नावाच्या एप्लीकेशन सोबत ही कार जोडण्यात आली आहे. काही कंट्रोल त्या ऍप मधून करता येणार आहेत. जसे की लॉक अनलॉक, हॉर्न त्यासोबतच चार्जिंग किती टक्के आहे. तसेच गाडी कोणत्या लोकेशन वर आहे. अशा बऱ्याच गोष्टी या ऍप मधून कळत आहेत. त्यामुळे ही कार हाताळणे अधिक सोयीस्कर बनले आहे.

ही कार खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर १३ लाख ३० हजार पासून ते २५ लाख ८० हजारांमध्ये ऑन रोड मिळेल. जर ही कार तुम्हाला खरेदी करायची असेल तर समजा तुम्ही २ लाख रुपये डाउन पेमेंट केले तर तुम्हाला बाकीच लोन करून महिन्याला २८ हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत हप्ता येऊ शकतो. प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असल्याने हप्त्याची एक्झॅक्ट अमाऊंट सांगता येणार नाही.

पण जर तुमचा सिबिल स्कोर आणि इनकम सोर्स चांगला असेल तर कमी व्याजदरात म्हणजेच ८.५०% मध्ये कर्ज मिळू शकते तसेच ७ वर्षांपर्यंतची परत फेड मिळू शकते. त्यामुळे तुमचा जर १ लाख फिक्स इनकम असेल तर ही कार तुमच्यासाठी योग्य राहील. ही कार खरेदी करण्यासाठी २ ते ३ महिन्याचा वेटिंग पीरियड आहे.

 

Ganesh Chavan

Is An Experienced Writer. He Has Previously Worked In Leading Newspapers, Pudhari, Loksatta

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment