Police Bharati 2026 | राज्यातील अनेक तरुण तरुणी सध्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. मात्र योग्यता असून देखील भरती प्रक्रियेत भरती होत नाहीत. काही विशिष्ट आणि महत्वाच्या गोष्टीकडे उमेदवारांनी विशेष लक्ष घालणे गरजेच आहे. या लेखाच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला याची परिपूर्ण माहिती देणार आहोत. पोलीस भरतीला समोर जाण्यापूर्वी आम्ही दिलेल्या टिप्स वापरून तुम्ही भरती होण्याचे नक्कीच चान्स वाढतील. Maharashtra Police Bharati 2026
१) ग्राउंड म्हणजेच शारीरिक चाचणी (police Bharati 2026) – भरतीला जाण्यापूर्वी शारीरिक चाचणीकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. रोज सकाळी कमीत कमी ४ ते ५ किलोमीटर रनिंग सुरू करा. जर तुम्ही रनिंग सुरुवात करत असाल तर हळू हळू अंतर वाढवा. सुरुवातीला तुमचा पळण्याचा वेग कमी ठेवा, हळू हळू त्यामध्ये सुधारणा करा. तुम्ही दररोज पळण्याचा सराव केल्याने तुमचा स्टॅमिना वाढतो. तसेच तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील रनिंग खूप महत्त्वाची आहे. तुम्ही नियमित रनिंग केल्याने मुलांसाठी १६०० मीटर आणि मुलींसाठी ८०० मीटर अंतर कमी वेळात पार होते. तुम्ही नियमित रनिंग केल्याने तुमच्या मनाची तयारी होते, इच्छाशक्ती वाढते आणि मानसिकेच्या आधारावर तुमच्या ध्येयापर्यंत जाणाऱ्या वाटा सोप्या वाटू लागतात. तसेच या सोबत तुमच्या मांड्या, पंजा, कंबर हे मजबूत होतात याचा फायदा पोलीस भरतीत होतोच पण आयुष्यभर निरोगी ठेवण्यास मदत होते. रनिंग बरोबर दररोज नियमित व्यायाम करणे देखील तेवढेच गरजेचे आहे. दररोज नियमित ३० ते ५० पुशअप्स मारणे गरजेचे आहे. पुलअप्स १० ते १५, सिटअप्स ५० ते ६०, आणि जास्तीत जास्त लांब उडी आणि गोळा फेकचा सराव करण महत्वाचं आहे.
२) लेखी परीक्षा (maharashtra police Bharati) – शारीरिक चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षा देणं महत्वाचं आहे. यामध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयांवर अभ्यास करण गरजेच आहे. प्रत्येक विषयाचे वेळापत्रक बनवून अभ्यास करावा, एखाद्या विषयातील एखादा प्रश्न समजला नाही तर तो समजून घ्यावा, यासाठी गूगलचा देखील वापर करू शकता. मागील ४ ते ५ वर्षातील प्रश्नपत्रिका सोडवा, प्रश्न कशे पडतात हे समजून घ्या. यासोबतच दैनिक वर्तमानपत्र वाचन करा (उदा. सकाळ, लोकमत, लोकसत्ता) यामुळे चालू घडामोडी नेमक्या काय सुरू आहेत, हे तुम्हाला समजू शकेल. यातीलच काही प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पडू शकतील. त्यामुळे प्रत्येक प्रश्न बारकाईने लक्ष देऊन समजून घ्या, दिवसातील जास्तकाळ हा अभ्यासिकेमध्ये द्या, त्याठिकाणी शांतता असल्यामुळे लगेचच एखाद्या प्रश्नाच उत्तर सापडेल. Maharashtra Police Bharati 2026
३) मोबाईलचा वापर टाळा (police Bharati) – पोलीस भरतीचा अभ्यास करताना मोबाईलचा जास्त वापर टाळा, कारण मोबाईलमुळे तुमचं लक्ष अभ्यासातून इतर गोष्टींमध्ये वळत आणि त्यामुळे तुमच मन अभ्यासावर लागत नाही. तुमची मानसिकता बदलते आणि अभ्यासामध्ये अनियंत्रिता येते. मोबाईलमुळे रात्री झोप होत नाही, आणि त्यामुळे तुमच्या दैनदिन जीवनावर परिणाम होतात. त्यामुळे मोबाईलचा अतिरेक टाळा. गरज असेल त्याच ठिकाणी मोबाईलचा वापर करा.
४) मानसिक तयारी – पोलीस भरतीमध्ये मानसिक तयारी असणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचे ग्राउंड चांगले आहे, लेखी परीक्षा देखील तुमच्यासाठी सोपी जाते मात्र जर तुमची मानसिक तयारी नसेल तर भरतीमधील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही हार मानता. तुम्ही नियमित सराव केलाय! तुम्हाला करून दाखवायचं आहे. मी पोलीस होऊनच परत येईल असा आत्मविश्वास बाळगा. ज्यावेळी तुमचा आत्मविश्वास पक्का असतो त्यावेळी ५० टक्के तुम्ही अगोदरच जिंकलेला असता. त्यामुळे कधीही कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींमुळे अगमविश्वास डळमळीत होऊ देऊ नका. स्वतः कष्ट केले आहे. यावर विश्वास ठेऊन भरती प्रक्रियेला तोंड द्या. Maharashtra Police Bharati 2026
Maharashtra Police Bharati 2026 – पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांनी खालील कागदपत्र तयार ठेवा (police bharati document list) –
- १० वी आणि १२ वी मार्कशीट
- आधार कार्ड (अपडेट केलेले)
- जात प्रमाणपत्र (विशिष्ठ प्रवर्गातील)
- रहिवासी दाखला
- क्रीडा प्रमाणपत्र (खेळामध्ये स्टेट स्तरावरील किंवा त्यावरील)
पोलिस भरतीसाठी सर्वाधिक सराव या गोष्टीचा करावा.
पोलिस भरतीची तयारी करत असाल तुम्ही यापूर्वी भरती प्रक्रियेत सामील झाला असाल तर तुम्हाला कोणत्या विषयात का ग्राउंड मधील कोणत्या प्रकारात मार्क कमी पडलेत हे तपासा. ज्या प्रकारात तुम्हाला मार्क कमी पडले असतील त्याचा सराव जास्त करा. त्या प्रकारावर पूर्ण फोकस करा. कारण पहिल्या प्रयत्नात त्या प्रकाराला कमी मार्क पडले याचा अर्थ त्या प्रकारात तुमचा सराव झालेला नाही. त्यामुळे सराव करून त्यात मार्क सुधारण्याचा प्रयत्न करा.
ग्राउंड मधील प्रकारातील धावण्यामध्ये १०० मीटर आणि १६०० मीटरचा चांगला सराव करणे गरजेचे आहे. अनेक पोलिस भरतीतील तरुणांना धावण्याने अपयश आल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. त्यामुळे धावण्याकडे विशेष लक्ष द्या. आणि वेळेत धावणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. भरतीला जाण्याच्या अगोदर भरतीमध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व अँक्टिव्हिटी चा सराव वारंवार करा. त्यामुळे भरतीमध्ये प्रयत्न करताना तुमच ध्येय गाठण्याची मानसिकता होते. आणि ध्येयाच्या दिशेने तुम्ही धावू शकता.
FAQ – वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न (Maharashtra Police Bharati 2026)
१) पोलीस भरतीसाठी शिक्षण किंवा शैक्षणिक पात्रता किती असावी?
उत्तर – पोलीस भरतीसाठी १२ वी पास ही मूळ पात्रता असणे बंधनकारक आहे. काही जागांसाठी पदवी असणे आवशक आहे.
२) पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर – पोलीस भरतीसाठी १८ ते २८ च्या मध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. आणि जर उमेदवार SC, ST, OBC असेल तर त्याला मोठी सूट दिली आहे. त्याचे वय ३३ वर्षांपर्यंत चालते.
३) पुरुषांना भरतीसाठी पात्र शारीरिक पात्रता काय आहे?
उत्तर – जर उमेदवार पुरुष असेल तर त्याला १६५ सेमी उंची आणि ७९ इंच छाती असणे आवशक आहे. (प्रवर्गानुसार बदलू शकते.
४) महिलांना भरतीसाठी पात्रता काय आहे?
उत्तर – पुरुषांच्या तुलनेत महिलांना यात मोठी सूट देण्यात आली आहे. १५५ सेमी पर्यंत उंची देण्यात आली आहे. मात्र संबंधित भरतीच्या जाहिरीमध्ये यात बदलही होऊ शकतो.
५) महाराष्ट्र पोलीस भरतीतील महत्वाचे टप्पे काय आहेत?
उत्तर – ऑनलाइन अर्ज त्यानंतर शारीरिक चाचणी त्यानंतर लेखी परीक्षा त्यानंतर डॉक्युमेंट पडताळणी त्यानंतर वैद्यकीय चाचणी आणि निवड
READ MORE –
केंद्रीय सशस्त्र दलात मोठी भरती, लगेच करा अर्ज











