लेखक हर्ष लिंबाचीया आणि कॉमेडीयन भारती सिंग यांच्यावर टांगती तलवार;200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल

मुंबई | लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा लेखक-निर्माता हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई एनसीबीने भारती आणि हर्ष यांच्या विरोधात 200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यांना 2020 मध्ये ड्रग्सच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली. याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.

Join WhatsApp Group

 

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीकडून कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या विरोधात तब्बल 200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे भारती आणि हर्षच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार हे आता जवळपास निश्चितच आहे.

 

2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणं बाहेर येऊ लागली. एनसीबीने तपास केल्यानंतर अनेक दिग्गज अभिनेत्रींची नावं समोर आली होती. एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची देखील चौकशी केली होती. त्यादरम्यान, भारती सिंह आणि तिचा पती हर्षच्या घरी आणि ऑफिसमध्ये देखील एनसीबीने छापेमारी केली होती. यावेळी त्यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. यानंतर एनसीबीने भारती आणि हर्षला अटक केली होती.

 

आता एनसीबीनं या प्रकरणी 200 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. एजन्सीच्या तपासात कोणते तथ्य समोर आले आहे, याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण पुन्हा एकदा भारती सिंह आणि हर्ष यांच्या अडचणीत नक्कीच वाढ होत आहे. त्यामुळे या दोघांवर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार लटकू शकते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button