टीम इंडियासाठी चिंताजनक बातमी! आशिया चषकाच्या आधीच मुख्य खेळाडू झाला जखमी
दिल्ली | आशिया चशक २०२२ आता लवकरच सुरू होणार आहे. अनेकांना या सामन्यासाठी भारतातील कोणते खेळाडू निवडले जाणार हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. मात्र अजूनही भारतीय संघात कोणता खेळाडू असणार आणि कोणता नसणार याची माहिती समोर आलेली नाही. अशात आता भारतीय एका खेळाडू विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारतीय वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला एक दुखापत झाली आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतून तो वगळला जाण्याची शक्यता आहे. हर्षल पटेलला साईड स्ट्रेनचा त्रास आहे आणि अशा परिस्थितीत त्याची आशिया कप 2022 साठी संघात निवड होण्याची शक्यता कमी आहे. आशिया चषक 2022 साठी भारतीय क्रिकेट संघाची सोमवारी घोषणा होणार आहे.
सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध भारत टी-२० मालिकेत खेळत आहे. यात हर्षल पटेल देखील खेळत होता. मात्र त्याच्या बरगड्यांना दुखापत झाल्याने तो आता टी – २० मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याचे चाहते थोडे नाराज झाले आहेत.
हर्षल पटेलला बरगडीला दुखापत झाली आहे आणि तो त्याच्या आजाराशी झगडत आहे. यामुळे हर्षल पटेलला वेस्ट इंडिजविरुद्धचे काही टी-20 सामने मुकावे लागले आहेत. त्याला सावरायला थोडा वेळ लागेल, त्यामुळे असे मानले जात आहे की, तो आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या काही सामन्यांत दिसणार नाही. मात्र, जर त्याची प्रकृती अशीच राहिली तर २०२२ च्या टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात त्याला स्थान मिळणार नाही.
• बीसीसीआयनं काय म्हणणं आहे? बीसीसीआयने म्हटले आहे की, हर्षल पटेल अजून या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. हर्षल पटेल त्याच्या बरगडीच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नसल्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरित दोन्ही टी-20 सामन्यांतून त्याला वगळले जात आहे. “
आता यावर तो आशिया चषक 2022 मध्ये दिसणार की नाही याच्यावर अजून काही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र आपली टीम जाहीर करण्यासाठी शेवटची दिनांक ही आठ ऑगस्ट आहे. उद्याचा शेवटचा दिवस आहे. अशाच हर्षलची प्रकृती सध्या ठीक नाही. त्यामुळे एका दिवसात तो पूर्णतः बरा होईल असे देखील वाटत नाही. त्यामुळे आशिया कप 2022 साठी त्याची निवड न होण्याची शक्यता जास्त आहे.