धोनीच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी! धोनीचा तो आजार बळावल्याने देत आहे मृत्युशी झुंज

रांची | क्रिकेट प्रेमींसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध खेळाडू महेंद्रसिंग धोनी हा सध्या एका आजाराने ग्रस्त झाला आहे. प्रत्येक खेळाडू हा आपला संघ जिंकावा या उद्देशाने आणि जिद्दीने खेळत असतो. यावेळी अंगरखून खेळणे कोणत्या खेळाडूला जमत नाही. प्रत्येक खेळासाठी प्रत्येक स्पर्धक हा जोमाने स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतो.
क्रिकेट, हॉकी, फुटबॉल अशा सर्वच खेळांमध्ये अनेक खेळाडू जखमी होत असतात. यामध्ये सचिन तेंडुलकर हे नाव प्रथम क्रमांकावर घ्यावे लागेल. सचिन तेंडुलकरने भारतीय संघासाठी जेवढे विक्रम नोंदवले आहेत त्याच्यापेक्षा अधिक वेळा तो जखमी झालेला आहे.
सचिन खेळांमध्ये अगदी चपळ आणि चतुर होता. त्याच्यासारखा खेळाडू क्रिकेटच्या कारकिर्दीत अजूनही झालेला नाही. मात्र मैदानावर खेळत असताना तो नेहमीच जखमी व्हायचा. असे असले तरी त्याच्या मनातील क्रिकेटचे प्रेम त्याला नेहमी जिंकण्यास भाग पाडायचे. आपले सर्व दुखणे विसरून तो मैदानावर उतरायचा आणि समोरील गडी हाणून पाडायचा.
आता महेंद्रसिंग धोनी हा देखील त्याच्या गुडघ्यांच्या आजारांमुळे त्रस्त झाला आहे. त्यामुळे तो त्याच्या गावी रांची येथे गेला आहे. इथे तो एका बाबांकडून आयुर्वेदिक उपचार करून घेत आहे. रांची येते एका पोलीस स्टेशनच्या आवारात एक बाबा झाडपाल्याचे औषध विकतात. त्यांच्या या आयुर्वेदिक औषधांचा अनेकांना गुण आला आहे. धोनीच्या आई-वडिलांनी देखील त्यांच्या आजारांवरती या बाबांकडून औषधोपचार करून घेतला होता. त्यामुळे धोनी देखील आता त्यांच्याकडून उपचार करून घेत आहे.
आयुर्वेदिक बाबा सर्व व्यक्तींकडून 40 रुपये घेतात. अशात धिनीकडून ते एकही जास्तीचा रुपया घेत नाहीत. धोनी येणार आहे हे समजल्यावर त्याच्या ठिकाणी मोठी गर्दी जमा होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून धोनी त्या बाबांकडून उपचार करून घेत आहे. क्रिकेटच्या कारकिर्दीत खेळत असताना तो अनेक वेळा जखमी झाला होता. त्यामुळे आता त्याच्या गुडघ्यांचे दुखणे बळावले आहे. त्यामुळे चाहते चिंतेत आहेत.