विल्यमसनला पराभव पचेना! भावूक होत म्हणाला…

ॲडलेड | न्यूझीलंड संघाचा संघनायक केन विल्यमसन हा गेली तिन वर्षे पराभवाचं दुःख उरावर घेऊन जगताना दिसतोय. त्यासाठी ही बाब खूपच दुःखदायक आहे. 2019, 2020, 2022 ला यावर्षी तो पाकिस्तान विरुद्धच्या T 20 विश्वचषकातून बाहेर गेलेला आहे. यामुळे मोठ संघाचं नुकसान झालंय.
काल झालेल्या सामन्यात पाकिस्तानने 5 चेंडू राखीव ठेऊन तसेच 7 गडी बाद करून विजयीपद मिळवले. एवढच नाही तर त्यान पाकिस्तानच कौतुकही केलं. त्याचे डोळे पाणावले होते. सामन्यानंतर त्याने संघ कुठ कमी पडला. त्याचप्रमाणे पाकिस्तान संघ कसा वरचड ठरला याबाबतही त्याने सांगितलं. मिचेल खेळला तेव्हा कुठं तरी खेळाला गती मिळाली. ही हार पचवणे आम्हाला अवघड जात आहे.
पुढे तो म्हणाला की पाकिस्तानने आमच्यावर विजयी मिळवला. अस असल तरीही यापुढील होणारा सामना भारत विरुद्ध इंग्लंड आहे. यात आता कोण बाजी मारेल हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. एवढच नाही तर आता पाकिस्तान हा संघ अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारत आणि इंग्लंड यापैकी आता कोणता संघ पाकिस्तानशी खेळेल. हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
सुरुवातीला न्यूझीलंड या संघान प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि 4 विकेट्स गमावून बसले. त्यानंतर 152 धावा पाकिस्तान संघाला चेस करण्यासाठी दिल्या अशावेळी पाकिस्तानने हे आव्हान स्वीकारून पाच चेंडू राखून 153 धावा काढत अंतिम सामन्यात प्रवेश केलाय.