बुमराह वर्ल्डकप खेळणार का? BCCI स्पष्टच बोलले, म्हणाले…

मुंबई | थोड्याच दिवसात ऑस्ट्रेलिया मध्ये T 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. यापूर्वी भारतीय संघाची प्रॅक्टीस सुरू झाली आहे. मात्र या विश्वचषकात भारतीय संघाचा फास्टर बॉलर जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याच्या चर्चांना उधाण झाले होते.
त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तसेच भारतीय संघाला हा मोठा धक्का मानला जात होता. मात्र याबाबत बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. जसप्रीत च्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पुढील 4 ते 6 महिने आराम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना स्पष्ट मत केले आहे. बुमराह बाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, विश्वचषकासाठी आणखी खूप वेळ आहे. एवढ्या लवकर वक्तव्य करणं ठिक नाही.
असे गांगुली यांनी सांगितले. त्यामुळे बुमराह याच्या तब्येतीत सुधारणा वाटली तर तो या विश्वचषकात खेळणार असल्याचे सांगितले जात आहे. येणारा T 20 वर्ल्डकप भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे भारताला या मध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे.