कॉमेडी विश्वाला लागली कोणाची नजर! राजू श्रीवास्तव यांच्या नंतर आणखी एका प्रसिध्द विनोदी कलाकाराचे निधन

मनोरंजन | प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं 21 सप्टेंबर रोजी दुःखद निधन झालं. या धक्क्यातून चाहते सावरत नाहीत. तोपर्यंत अजून एका कॉमेडियनच निधन झालं आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या पहिल्या सीझनमधून त्यांनी प्रेक्षकांच मनोरंजन केल होत. पराग यांचे जवळचे मित्र आणि कॉमेडियन सुनिल पाल यांनी ही दु:खद बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. आणखी एक विनोदवीर गमावल्यान चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
पराग कंसारा हे वडोदरामधील या ठिकाणचे रहिवसी होते. ते एका द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमध्ये सहभागी झाले होते. पहिल्या सीझनमध्ये त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली होती मात्र ही स्पर्धा ते जिंकले नव्हते. यानंतरही पराग यांनी अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले. पण गेल्या काही वर्षांपासून ते कॉमेडी विश्वापासून दूर होते.
कॉमेडियन सुनील पाल यांनी व्यक्त केला शोक – ‘कॉमेडी विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पराग कनसाराजी, आमचे लाफ्टर चॅलेंजचे पार्टनर आता आपल्यात नाहीत. प्रत्येक गोष्टीचा विरुद्ध विचार करत ते आम्हाला हसवायचे. पराग भैय्या यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.
कॉमेडी विश्वाला कोणाची नजर लागली काय माहीत? काही दिवसांपूर्वीच आम्ही राजू भाईला गमावलं. एकानंतर एक कॉमेडीच्या खंबीर स्तंभांना आपण गमावत आहोत, अशा शब्दांत सुनील पाल व्यक्त झाले. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘हप्पू की उल्टन पल्टन’ फेम अभिनेते दीपेश भान यांचीही आठवण काढली.