सुंदरा मनामध्ये भरली’या मालिकेतील अभ्याच कस काय होणार…?

मुंबई | ‘सुंदरा मनामध्ये भरली’या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही मालिका एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. ते म्हणजे मालिकेतील प्रमुखनायक ‘अभ्या’ अचानकच गायब झाला असून तो गेला असल्याचे दाखवण्यात आले आहेत. त्याच्या माघारी लतिकाला एक मुलगी असून अभ्याचं अकॅडमीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती राबताना दाखवले आहे.

Join WhatsApp Group

 

 

अभ्या म्हणजेच अभनेता समीर परांजपे कुठे आहे, त्याने मालिका का सोडली, तो परत येणार का असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. अशातच या मालिकेने 700 भाग पूर्ण केले. मात्र यावेळीही सेलिब्रेशनमध्ये अभ्या म्हणजेच अभिनेता समीर परांजपे नव्हता. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनाला चांगलीच खंत लागली आहे. त्यामुळे अभ्या पर्व यावा अशी मागणी चाहते करत आहेत.

 

 

ही मालिका सध्या टीकेच्या तोंडावर आहे. मालिकेतील प्रमुख नायक, अभ्याची झालेली अचानक एक्झिट, त्याच्या मुलीचं येणं आणि नव्या नायकाची एंट्री प्रेक्षकांच्या पचणी पडली नाहीय. . ही मालिका प्रचंड लोकप्रिय असल्याने नुकतेच या मालिकेने 700 भाग पूर्ण केले. या निमित्ताने झालेल्या सोहळ्यात सर्व कलाकार उपस्थित होते, परंतु अभ्या म्हणजेच समीर परांजपे नसल्याने चाहत्यांच्या मनाला रुखरुख लागली आहे.

 

 

पाच वर्षाचा लीप दाखवण्यात आल्याने अभ्या हा मालिकेतून आता गायब होणार आहे. मालिकेचा नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये लतिका हिला मुलगी झाल्याचे दाखवण्यात आले आहे. ही मुलगी तिच्या आईला विचारताना दिसत आहे की बाबा कुठे गेले त्यांना वरतून बोलावून आण. त्यामुळे आता मालिकेतून अभ्या म्हणजेच अभिनेता समीर परांजपे याची भूमिका संपली आहे, असेच संकेत आता मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button