जया बच्चन यांच्या रागाला औषध काय..?

मुंबई | अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन या नेहमीच चर्चेत दिसतात. त्या नेहमी चाहत्यांवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. दिवाळी सणामध्येच त्या पुन्हा एकदा फोटोग्राफरवर चिढल्या आहेत. एका व्हिडिओमध्ये त्यानी फोटोग्राफर्सच्या मागे जाण्यापर्यंत राग व्यक्त केला आहे.

Join WhatsApp Group

 

काही दिवसांपूर्वी नवरात्रोत्सव सण झाला. यावेळी जया बच्चन व्हिडिओ काढणाऱ्या चाहत्यांवर संतापल्या होत्या. अशावेळी त्या म्हणाल्या की; फोटो काढताना लाज कशी वाटली नाही. अस त्यांनी सुनावले. वास्तविक त्या कार्यक्रमामध्ये त्याचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन देखील उपस्थित होता.

 

अभिषेक चाहत्यांना मनसोक्तपणे फोटो घेऊ देत होता. जया बच्चन यावेळी चिडलेल्या दिसल्या. त्यांचा संताप अनावर झाला होता. आताही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये जया बच्चन यांचा राग दिसून येईल. ऐन दिवाळीच्या निमित्तानं फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्यांना जया बच्चन यांच्या रागाला सामोरं जावं लागलं आहे.

 

बच्चन फॅमिली दिवाळी साजरी करत असताना काही फोटोग्राफर्स यांनी फोटोशूट करण्यासाठी बंगल्याच्या बाहेर उभे राहून फोटोशूट करत होते. अशावेळी जया बच्चन यांना हे सहन झाले नाही अशावेळी त्या त्यांच्या मागे जाऊन त्यांना हकलवण्याचा प्रयत्न करत होत्या अस व्हिडिओमध्ये दिसतेय. अशावेळी काही नेटकऱ्यानी त्यांच्या रागावर निराशा व्यक्त केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button