तारक मेहता फेम अंजली भाभींना झालंय तरी काय? मालिका सोडल्यावर झाली अशी दशा; व्हिडिओ पाहून धक्काच बसेल

मुंबई |  तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. आता या मालिकेमध्ये वेगवेगळे कलाकार दाखल झाले आहेत. कलाकारांनी ही मालिका सोडलेली आहे. मात्र असे असले तरी जुने कलाकार हे भरपूर काळापासून या मालिकेमध्ये कार्यरत होते. त्यामुळे चाहते आजही त्या कलाकारांवर प्रेम करतात. त्यामुळेच या मालिकेशी जोडलेल्या प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात होणाऱ्या घडामोडींवर चाहत्यांचे लक्ष असते. त्यातीलच एक अंजली भाभी.

तारक मेहता का उल्टा चश्मा शो मध्ये अंजली भाभी हे पात्र अभिनेत्री नेहा मेहता या अभिनेत्रीने साकारले होते. तिने साकारलेली अंजली भाभी घराघरात पोहोचली. अंजली भाभीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. साल 2020 मध्ये नेहाने ही मालिका सोडून दिली. यावेळी सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. कारण तिने मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी सोशल मीडियावर आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसल्या.

त्यानंतर नेहा सोशल मीडियावर दिसलीच नाही. अचानक ती सोशल मीडियापासून गायब झाली. त्यामुळे अनेक चाहते तिला वेगवेगळे प्रश्न विचारू लागले होते. आता गणेश चतुर्थी निमित्त सर्वच कलाकार आपल्या घरी आलेल्या गणरायाचे थाटामाटात स्वागत करत आहेत. नेहाच्या घरी देखील गणपती बाप्पा आलेले आहेत. अशात सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिची परिस्थिती पाहून सर्वजण थक्क झालेत.

व्हिडिओमध्ये नेहा आधी नो मेकअप लुकमध्ये दिसत आहे. नो मेकअप लूकमध्ये ती फारशी चांगली दिसत नाही. त्यानंतर ती लगेचच मेकअप लुकमध्ये दिसत आहे. दोन वेगवेगळे लूक दाखवतानाचा तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत असताना पोस्ट केला आहे.

व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.” तिच्या या व्हिडिओवर चाहते वेगवेगळे कमेंट करत आहेत. तसेच तिला मालिकेमध्ये पुन्हा येण्यास आग्रह देखील करत आहेत. मात्रा अंजली भाभीची रिप्लेसमेंट केली गेली आहे. मालिकेमध्ये हे पात्र सूनैना फौजदार साकारत आहे.

नेहा मेहताने तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका कोणतीही नोटीस किंवा कोणताही पत्रव्यवहार न करता सोडून दिली होती. मालिका सोडून ती गप्प घरामध्ये बसून राहिली होती. यावेळी निर्माते प्रचंड हैराण झाले होते. ते सातत्याने तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ती अजिबात कोणतेही उत्तर देत नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी अशी माहिती समोर आली की तिला तिच्या कामाचे सहा महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत. वारंवार हक्काचे पैसे मागून देखील ते मिळत नसल्याने कंटाळून तिने ही मालिका सोडली. या सर्व गोष्टीचा खुलासा अभिनेत्रीने स्वतः केला होता.

https://www.instagram.com/reel/Ch4q_4yLeLV/?igshid=YmMyMTA2M2Y=

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button