आपल्या दादुसला वाहिनी भेटली बरं.. दगडूची खऱ्या आयुष्यातील प्राजू पहा..

मुंबई | ‘टाइमपास’ या चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परबला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील ‘दगडू’ हा घराघरात पोहोचला. कोवळ्या वयातील प्रेमकहाणीचा हीरो म्हणून दगडूला तेव्हा लोकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं. त्याचे कित्येक डायलॉग आजही लोकांच्या ओठांवर आहेत. या चित्रपटाची लोकप्रियता पाहून दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाचे पुढचे 2 भाग काढले आणि त्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
प्रथमेशने आतापर्यंत अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रथमेशने बालक-पालक, टाईमपास, टाईमपास 2, लालबागची राणी, उर्फी अशा अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये त्याने विविध भूमिकांमध्ये काम केले आहे. या सिनेमांमुळे तो आता स्टार झाला आहे. ‘बालक-पालक’ या सिनेमातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या सिनेमात त्याने छोटीशी भूमिका साकारली होती.
टकटक 2 मधून देखील त्याला चांगलीच प्रौढी मिळाली. हाच प्रथमेश परब आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेला दिसतोय. अभिनेता प्रथमेश परब हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असताना दिसतो. नेहमीच त्याच्या पोस्ट व्हायरल होताना दिसतात. यावेळी सोशल मीडियावर प्रथमेशनं दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी जरी असली तरीही शुभेच्छा जरा वेगळ्याच धाटणीच्या आहेत.
क्षितिजा घोसळकर सह त्याने फोटोशूट केलं आहे.एवढच नाही तर मध्यंतरी त्यान तिच्यासह फोटोशूट केले होते. त्याच नक्की कारण अजूनही समोर आल नाही. तरीही नेटकऱ्यांनी या फोटोवर बऱ्याच कमेंट केल्या आहेत. नेटकरी म्हणाले.. काय दादुस ही वाहिनी का..? तरीही यावे अजून दोघांनी नात्याबद्दल स्पष्टीकरण दिलं नाही.