आशिया चषकामध्ये विराट कोहली नोंदविणार हा विक्रम
मुंबई | येत्या २७ ऑगस्ट पासून आशिया चषक २०२२ सुरू होतं आहे. काही दिवसांपूर्वी या चाशकात भारतीय संघातील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. विराट कोहलीने आता पर्यंत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतीय संघातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा तिसरा क्रमांक लागतो. मात्र गेल्या काही समन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे चाहते त्याच्यावर नाराज आहेत.
अशात वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यात तो दिसला नाही. यात त्याला विश्रांती दिली गेली. भारताने हा सामना ४-१ ने जिंकला. लवकरच सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत मात्र विराटला देखील घेतले आहे. एकूण १५ जणांच्या यादीत त्याचे देखील नाव आहे. नुकताच झिम्बाब्वेचा दौरा झाला आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली इथे एक दिवसीय सामना रंगलेला दिसेल.
२७ ऑगस्टला आशिया चषक सुरू झाल्यास पुढे २८ ऑगस्टला पाकिस्तान बरोबर सामना रंगणार आहे. यात यावेळी विराट कोहली असल्याने तो पाकिस्तानला हरवेल असे अनेक जण म्हणत आहेत. यात रोहित शर्मा हा कर्णधार आहे. त्याने आता पर्यंत १३२ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांमध्ये आता पर्यंत विराट ९९ वेळा खेळला आहे. यंदाचा त्याचा १०० वा सामना असणार आहे.
• आतापर्यंत विराटने केलेल्या सर्वाधिक धावा – विराट कोहली सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतो. विराट कोहलीने आतापर्यंत टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 99 सामने खेळले आहेत त्यामध्ये त्याने 91 डावांमध्ये पन्नास ची सरासरी पकडत ३३०८ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याच्या नावावर ३० अर्धशतके आहेत.
T २० च्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत त्याने 344 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 227 गावांमध्ये 40 ची सरासरी धरत १०६२६ धावा करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. आतापर्यंत त्याने एकूण ५ शतके जिंकली आहेत, तर 78 अर्धशतके जिंकली आहेत.
• पाकिस्तान विरोधात केलेली कामगिरी – आतापर्यंत पाकिस्तानबरोबर झालेल्या सामन्यांमध्ये विराट कोहलीने चांगली कामगिरी केली आहे. जबरदस्त फलंदाजी करत त्याने बऱ्याच धावा केल्या आहेत. पाकिस्तानच्या विरोधात आतापर्यंत त्यानी ७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानी 311 धावा केल्या आहेत.
या वेळेचा त्याचा स्ट्राइक रेट 118 आहे. आतापर्यंत भारतातल्या इतर कोणत्याही खेळाडूला एवढ्या धावा करता आलेल्या नाही. केएल राहुलने एका सामन्यात ३ धावा केल्या होत्या. रोहित ने आठ सामन्यात 70 धावा, गौतम ने पाच सामन्यात 139 धावा, तर युवराज सिंगने आठ सामन्यात 155 धावा केल्या आहेत.