टी २० विश्वचषकातून विराट कोहलीला बाहेरचा रस्ता?

मुंबई | विराट कोहलीने गेल्या वर्षी टी-२० फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडत काढता पाय घेतला. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद काढून घेतले आणि दोन्ही फॉरमॅटचे कर्णधार पद रोहित शर्माकडे सोपवले. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने या फॉरमॅटचेही कर्णधारपद सोडले.

Join WhatsApp Group

 

त्यामुळे त्याचे चाहते नाराज आहेत. भारतीय बोर्ड कोहलीशी चांगले वागत नसल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कसोटी मालिकेत कर्णधार पद सोडले. त्यामुळे या चर्चेला अधिक उधाण आले. चाहते बिसीसीआय वर नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच अनेक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

 

आता या सर्व मुद्द्यावर भारतीय मंडळाचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी खुलासा करताना एक वक्तव्य केले आहे. धुमाळ यांनी म्हटले आहे की, ” हे चुकीचे आहे. कोहलीने स्वतः कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर केला. निवडीच्या सर्व बाबी निवडकर्त्यांद्वारे देखील पाहिल्या जातात. त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.”

 

अरुण धुमाळ यांनी क्रीडा पत्रकार विमल कुमार यांना त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “विराट कोहली सामान्य खेळाडू नाही. त्याने भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान सर्वोत्तम आहे. विराटने लवकरात लवकर फॉर्ममध्ये यावे अशी आमची इच्छा आहे. जोपर्यंत संघ निवडीचा प्रश्न आहे, तो आम्ही निवडकर्त्यांवर सोडला आहे. कोणाला वगळायचे आणि कोणाला घ्यायचे हे त्यांनीच ठरवायचे आहे.”

 

अरुण धुमाळ यांच्या या वक्तव्यामुळे आता चाहते थोडे शांत झाले आहेत. मात्र विराटला पुन्हा घेण्या बाबत त्यांनी ठोस काहीच सांगितले नाही. अशात आता आशिया चषक २०२२ मध्ये तो असणार का या बाबतचा तिढा अजून कायम आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button