दिग्गज अंपायरचा भीषण अपघातात मृत्यू; क्रिकेट विश्वात शोककळा
दिल्ली | 9 ऑगस्ट हा दिवस क्रिकेट विश्वासाठी देखील दुःखाचा दिवस ठरला आहे. दक्षिण आफ्रिका पंच रूढी कर्स्टन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मावळली. एका ठिकाणी जात असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. आफ्रिकेतील रिव्हर्सडेल येथे त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यावेळी गाडीत अन्य तीन व्यक्ती देखील होत्या. अपघात एवढा भीषण होता की, यातील सर्व व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार सकाळी ते केपटाऊनमधील नेल्डन मंडेला बे येथील त्यांच्या घरी गोल्फ खेळून ते परत येत होते. मात्र रस्त्यात रिव्हर्सडेल येथे त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. त्यांची कार दुसऱ्या एका कारला जोरदार धडकली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
प्रतिष्ठित पंचांमध्ये रुडी यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. त्यांनी मैदानी पंच म्हणून 332 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये काम केले आहे. यामध्ये 2090 108 कसोटी आणि 14 t20 सामने आहेत. आयसीसीच्या एलिट पॅनेलचाही ते बरेच वर्ष एक भाग बनून राहिले. एकूण अठरा वर्षे ते पंच म्हणून कार्यरत राहिले. ९ डिसेंबर १९९२ साली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघाचा वनडे सामना रंगला होता. यात ते प्रथमच पंच म्हणून दिसले.