जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा मुलगा करतोय हटके काम; आईचं स्वप्न केलं पूर्ण

मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ गेल्या चार दशकांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी-सराफ यादेखील एक अभिनेत्री असून त्यांनीही मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजही हे दोघे या क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेतनं वेगळ्याच क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अनेक सुपरस्टार्सची मुलं ही आई-वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत थेट सिनेसृष्टीत मोठ्या दिमाखात पदार्पण करतात. पण अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफचं तसं नाही. त्याला अभिनयात रस नाही. अनिकेतच्या वर्कबद्दल बोलायचं झालं तर तो एक उत्तम शेफ आहे. पाश्चिमात्त्य पध्दतीचं जेवण बनविण्यात त्याचा हातखंडा आहे. युट्यूबवर त्याचं निक सराफ नावाचं चॅनेलसुध्दा आहे. तिथे तो त्याच्या रेसिपीजचे विविध व्हिडीओ अपलोड करतो. खुद्द त्याची आई निवेदिता सराफ यासुध्दा त्याच्याकडूनच विविध पाश्चिमात्य रेसिपीज् शिकतात.
आईच स्वप्न पूर्ण:
एका मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी सांगितले होते की, मुलाने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करावे, अशी माझी इच्छा होती. अनिकेतने माझी स्वप्नपुर्ती केली आहे. वडील अशोक सराफ यांना अनिकेतच्या हातच्या ब्राऊनी खूप आवडतात. तर आई निवेदिताला अनिकेतने बनवलेला मार्बल केक आवडतो.
अनिकेत सराफच्या शिक्षणाविषयी:
दादर कॅटरिंग कॉलेजमधून अनिकेत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो फ्रान्सला गेला आणि त्याठिकाणी कुकिंगचा कोर्स करून भारतात परतला.