उर्मिलाचा पती आहे खूपचं सुंदर; करतोय ‘हे’ काम?

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारे तुम्हाला माहित असेल. तिने अनेक व्यासपीठावरून रसिकांचे चांगले मनोरंजन केलं आहे. उर्मिलाला प्रकाश झोतात यायला खूप उशीर झाला.

 

तिने काकण, प्यार वाली लव्ह स्टोरी, दुनियादारी, टाईमपास, गुरू या मुख्य चित्रपटात भूमिका साकारली आहे. ती दूनियारी आणि गुरू या चित्रपटाने प्रकाश झोतात आली. मराठी चित्रपट सृष्टी सोबत तिने हिंदी कला विश्वात देखील काम केले आहे.

 

तिने हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक मालिकांमध्ये देखील भूमिका साकारली आहे. तिचा आई शपथ हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेला होता. तिच्या अभिनयामुळे तिचे लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग बनला आहे.

 

तिच्या खासगी आयुष्यातील माहिती फार कमी लोकांना माहीत आहे. आज आपण तिच्या खासगी आयुष्यातील काही माहिती जाणून घेणार आहोत. 2011 साली उर्मिला ने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच साली तिने लग्नगाठ बांधली.

 

तिच्या क्षेत्रात म्हणजेच कला विश्वात काम करत असलेले दिग्गज निर्माते, अभिनेते आदिनाथ कोठारे यांच्या सोबत तिने लग्नगाठ बांधली. आदिनाथ आणि ऊर्मिला हे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते.

 

अनेक दिवस एकमेकांच्या प्रेमात राहून, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 2011 साली त्यांनी विवाह केला. आदिनाथ हे प्रोडुसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी फुल 3 धमाल, झपाटलेला 2 तसेच मन उधाण वाऱ्याचे, जय मल्हार या मालिकांचे निर्माते म्हणून काम पाहिले आहे.

 

तसेच त्यांनी चंद्रमुखी, माझा छकुला या सारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांना चाहत्यांनी अनेक दिवस डोक्यावर देखील घेतलं होते. त्यांचे लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button