दुर्दैवी! शाळेतून घरी येताना आजोबा अन् नातू जिवंत परतलाच नाही, आजोबांच्या देखत नातूने सोडले प्राण; अजोबांचाही मृत्यू

पुणे | राज्यात अपघाताचे( pune accident case) प्रमाण वाढले असून रोजच्या अपघाताला नागरिक कंटाळून गेले आहे. पुण्यासारख्या महानगरामध्ये तर रोजच अपघात होताना दिसत आहेत. पुरंदर तालुक्यातील पुणे – पंढरपूर या रस्त्यावर दोन मोटारसायकल मधील झालेल्या अपघातात नातू आणि आजोबा या दोघांनाही जीव गमवावा लागला. या अपघातात मृत्यू झालेले गोकुळ झेंडे आणि पद्मनाभ झेंडे हे आहेत. शाळा सुटल्यानंतर आपल्या नातवाला घरी घेऊन जात असताना दोन मोटर सायकलच्या धडकेत गोकुळ झेंडे आणि पद्मनाभ झेंडे ठार झाले आहेत. (Pune accident case)
मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ झेंडे हे आपला नातू पद्मनाभ झेंडे याला शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन जाण्यासाठी ते दिवे येथे आले होते. गोकुळ झेंडे हे रस्ता क्रॉस करत असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकल ने जोराची धडक दिली. या धडकेत आजोबा आणि नातवाला जास्त गंभीर मार लागला होता.यामुळे नातू जागेवरच ठार झाला.
आजोबांना ताबडतोब रुग्णालयात घेऊन जाण्यात आले परंतु गाडीत उपचार चालू असतानाच गोकुळ झेंडे यांचा जीव गेला. ज्या गाडीने गोकुळ यांच्या गाडीला धडक दिली होती ती गाडी स्पोर्ट बाईक होते. स्पोर्ट बाईक ही जास्त वेगात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गोकुळ यांच्या गाडीला जोराची धडक बसली. (Pune accident case)
या अपघातामुळे पुणे पोलिसांनी यशवार्धन मगदुत या व्यक्तीला ताब्यात घेतले. तेथील परिसरात नातूच्या आणि आजोबांच्या मृत्यू मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांनी यशवर्धन याच्या गाडीला आग लावून दिली. त्यामुळे परिसरात अधिक तणाव आणखी वाढला होता.
पोलिसांनी नागरिकांची समजूत काढत त्यांना शांत केले तसेच परिसरात असणारा तणाव दूर केला. आजोबा आणि नातू दोघेही एकाच वेळी मरण पावल्यामुळे झेंडे परिवारावर शोककळा पसरली. या अपघाताचा तपास हे हडपसर येथील पोलिस करत आहेत. अधिक माहिती तपास पूर्ण झाल्यावर देऊ असे हडपसर येथील पोलिसांनी सांगितले.(pune accident case)