दुर्दैवी! सातव्या मजल्यावरून पडुन चिमुकलीचा अंत; घटनेनं परिसर हादरला

वसई | प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. लहान मुलं खूप चंचल असतात. ते कधी काय करतील याचा काही नेम नसतो. त्यामुळे डोळ्यात तेल घालून त्यांना जपावे लागते. मात्र वसईमध्ये एक हृदयाचा ठोका चुकवणारी मोठी घटना घडली आहे. यामध्ये सातव्या मजल्यावरून पडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

Join WhatsApp Group

 

वसई येथील अग्रवाल सिटीमध्ये महाजन कुटुंबीय सातव्या मजल्यावर राहत आहेत. त्यांना दोन मुली आहेत. घरी पती पत्नी आणि एक आजी तसेच त्यांच्या दोन मुली असा परिवार होता. हसतमुख हे कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होतं. मात्र आता त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून त्यांची लहान मुलगी या जगात नाही.

 

श्रेया महाजन असं मृत मुलीचं नाव आहे. अवघ्या तीन वर्षांची ही मुलगी बाल्कनीतून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी तिचे बाबा कामाला गेले होते. तसेच तिची आई मोठ्या बहिणीला शाळेत सोडवायला गेली होती. त्यावेळी घरी फक्त तिची आजी आणि ती अशा दोघीच हित्या. आई जेव्हा मोठ्या मुलीला शाळेत सोडवायला गेली तेव्हा ती झोपली होती.

 

थोड्या वेळाने ती उठली त्यावेळी आई घरात दिसत नसल्याने तिने हातात फोन घेतला आणि बाल्कनीमध्ये उभी राहून ती आईची वाट पाहत होती. याच वेळी तिच्या हातातला फोन खाली पडला. फोन कुठे पडला हे पाहत असताना ती बाल्कनीच्या ग्रिलवर चढली. त्यातच तिचा तोल गेला आणि ती सातव्या मजल्यावरून खाली पडली. घटना घडल्यावर लगेचच तिथे सगळ्यांनी गर्दी केली. तसेच तिला दवाखान्यात देखील नेले. मात्र तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यामुळे महाजन कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button