या प्रसिध्द कलाकारांचा दुर्दैवी मृत्यू; थोडक्या कालावधीत घेतला अखेरचा श्वास
मुंबई | कोरोना महामारीच्या काळात अनेक कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. यामध्ये मराठी सिने विश्वातील देखील बरेच कलाकार आहेत. या बातमीतून 2020 मध्ये मृत्यू झालेल्या कलाकारांची माहिती घेऊ. आशालता वाबगावकर : कोरोना महामारीच्या काळात 22 सप्टेंबर रोजी आशालाताई यांची प्राणज्योत मालवली. त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वास दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी माहेरची साडी या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्यांच्या खलनायिकेच्या भूमिकेला अनेकांची पसंती मिळाली होती. गंमत जंमत आणि वन रूम किचन अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. ज्यावेळी त्यांचे निधन झाले त्यावेळी त्या आई माझी काळुबाई या आध्यात्मिक मालिकेत काम करत होत्या.
चंद्रकांत गोखले – चंद्रकांत गोखले हे विक्रम गोखले यांचे वडील होते. 20 जून 2020 रोजी ते आपल्याला सोडून आनंतात विलीन झाले. सुहागरात, साधी माणस, लोफर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. टीव्हीवरील आणि कार्यक्रमांमध्ये देखील ते सहभागी व्हायचे. मात्र आजारपणामुळे ते खूप त्रस्त होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
कमल कोठे – बेंगलोरच्या एका खाजगी रुग्णालयात कर्करोगाशी झुंज देत असताना या अभिनेत्रीचे निधन झाले. लागिर झालं जी या मालिकेमध्ये त्यांनी आजीबाईची भूमिका साकारली होती. खूप कमी कालावधीत त्यांनी मोठ्याच्या चाहतावर्ग स्वतःकडे आकर्षित केला होता. मात्र आजारपणामुळे वयाच्या 74 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
जयराम कुलकर्णी – बनावट आणि थरथराट या चित्रपटांमध्ये गाजलेले अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मार्च महिन्यात साल 2022 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजही त्यांचा अभिनय आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका चाहते आवडीने पाहतात. मराठी सिनेसृष्टीचा ते एक अविभाज्य भाग होते.
आशुतोष भाकरे – अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आणि सुप्रसिद्ध अभिनेता आशुतोष यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्याच्या निधनावेळी देखील मराठी सिनेसृष्टी हादरली होती. आयुष्यात असलेल्या निराशांमुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. भाकर आणि विचार ठरला पक्का हे त्याचे दोन चित्रपट खूप गाजले. या चित्रपटांमधूनच तो प्रसिद्धीझोतात होता.