दुर्दैवी! ‘बाबा मला लवकर घरी घेऊन जा’ मुलीने फोन केला मात्र वडील पोहचे पर्यंत वेगळंच घडलं

पुणे | कोणतेही आई वडील आपल्या मुला मुलींना त्यांच्या जिवापेक्षा जास्त जपत असतात. आपला मुला मुलींचे सगळे लाड कायम पुरवत असतात. मुलीचे लग्न झाल्यावर देखील आई आणि वडील हे मुलीला सासरी पाठवत असताना रडत असतात. त्या दोघांचीही एकच इच्छा असते ती म्हणजे आपल्या आपल्या मुलीने सुखी रहावे. आनंदात मुलीने जीवन जगावे.याच परिस्थितीत मुलीला सासर कडून त्रास होत असेल तर बाप हा काहीही करू शकतो.
असाच एक प्रकार घडला आहे. इंदोर या ठिकाणी ही घटना घडली. इंदोर मध्ये अजय भाई नावाचा एक व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत रहात होता. कुटुंब मोठे होते. त्यामुळे घरात असणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती. कुटुंबात पत्नीसोबत आईवडील, मुले,भाऊ राहत होते. त्याची पत्नी टिना हिला खूप वेळा सासरच्या लोकांनी त्रास दिला. सासू सासरे हे टिनाला माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत होते. पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून त्रास देत होते. कधीकधी मारत ही असत.
टिनाच्या घरची परिस्थिती बेताची होती. अशात घरचे 5 लाख रुपये कोठून आणतील असा प्रश्न होता. त्यामुळे टिनाने आपल्या सासू आणि दिराला सांगितले घरी पैसे नाहीत. त्यामुळे मी पाच लाख रुपये आणि शकत नाही. या गोष्टीमुळे टिनाची सासू आणि दिर दोघेही क्रोधित झाले. त्यांनी तिला रागवयला सुरुवात केली. टिनाने फोन करून घडलेला प्रकार सांगितला .तसेच टिनाने सांगितले बाबा मला लवकर घरी घेऊन जा, सासू आणि दिर खूप छल करत आहेत. मारहाण देखील करत आहेत आता मला सहन होत नाही.
मुलीच्या घरच्यांनी सासरच्या लोकांना भेटण्यासाठी निघाले होते. रात्रीच्या वेळी मुलीच्या घरी जाण्याअगोदर त्यांना फोन आला की तुमची लाडकी लेक आता या जगात नाही. मुलगी टिना ही या जगात नसल्याने टिनाच्या आई आणि वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी पोलिसांना फोन करून सांगितले. पोलिस घटना स्थळी पोहोचले त्यांनी मृतदेहाची तपासणी केली. तेथे कोणतीही चीठी सापडली किंवा आढळून आली नाही. पोलिसांनी मृतदेह टिनाच्या वडीलांच्या ताब्यात दिला. टिनाच्या वडिलांनी सासू सासरे आणि दिराच्या विरोधात तक्रार केली. टिनाला दिर आणि सासू मारहाण करत होते. पाच लाख रुपयाची मागणी करत होते.
दुपारीच मी अजय ला बोलून सायंकाळी भेटायला येतील सांगितले होते. तो कामात व्यस्त होता. घरी गेल्यावर टिना ही बेशुद्ध पडली असल्याचे दिसले. त्याने तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. परंतु ती दवाखान्यात जाण्याअगोदर मरण पावली. पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांनी छळ केला असा आरोप टिनाच्या वडिलांनी सासरच्या लोकांवर केला. टिनाला मारहाण केली होती.त्यामुळे टिनाच्या हातावर आणि पायावर जखमा होत्या. यांबद्दल पोलिसांनी पोस्ट मर्तम करून तपास केला.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .