तुषार कपूरने नेपोटिझमबद्दल व्यक्त केलं मत

मुंबई | बॉलिवूड कलाकारांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलेही सिनेसृष्टीत पदार्पण करतात. बॉलिवूड स्टार किड्सबाबत लोकांच्या मनात एक प्रतिमा आहे. स्टार किड्सना इंडस्ट्रीत संघर्ष करावा लागत नाही, असे बहुतेकांना वाटते. पण प्रत्यक्षात सत्य परिस्थिती यापेक्षा काही वेगळीच असते.
या मुद्द्यावर चित्रपट जगतातील अनेक स्टार्स बोलले आहेत. तुषार कपूर देखील या मोजक्या अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान तुषार कपूरही यावर मोकळेपणाने बोलला आहे.
तुषार कपूर ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र यांचा मुलगा आहे. मात्र, असे असूनही त्याला स्टार किड असल्याचा कोणताही लाभ मिळाला नाही. तुषार कपूरचा असा विश्वास आहे की रेड कार्पेट प्रत्येक स्टार किडसाठी नाही. याबाबत बोलताना त्याने मुलाखतीत एक प्रसंग सांगितला आहे.
तुषार कपूरने अखेर सत्य सांगितलं:
मुझे कुछ कहना है’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तुषारसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, स्टार किड असताना अभिनेता करिनाची तासनतास वाट पाहत असे. तो म्हणाला, ‘मला दुसरी स्टार किड करीना कपूर खानसाठी 12-14 तास थांबावे लागले कारण ती त्यावेळी चार चित्रपटांमध्ये एकत्र काम करत होती.
दरम्यान, त्याच्या आगामी ‘मारिच’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तुषार कपूर या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर नसीरुद्दीन शाह देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.