दुःखद: छोट्याशा चुकीमुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू; तो कामाचा दिवस ठरला अखेरचा

कोल्हापूर | गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघात हे वाढतच आहेत. शहरातील बऱ्याच ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी असल्याने तर खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याचे सांगण्यात येते आहे.
कोल्हापुरातील रंकाळा टॉवर जवळ जेसीबीच्या बकेट चा थोडासा धक्का बसून दुचाकीवरील महिला जेसीबी खाली पडल्याने चिरडून निधन झाल्याची घटना घडली आहे. अनुराधा मिलिंद पोतदार असे या अपघातात निधन पावलेल्या महिलेचे नाव आहे. अनुराधा या कोल्हापुरातील दवाखान्यात ड्युटीवर होत्या. या अपघातामध्ये मिलिंद पोतदार हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी अनुराधाला ड्युटीवर सोडवण्यासाठी मिलिंद पोतदार हे गाडीवर निघाले होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना जेसीबीच्या बकेट चां धक्का दुचाकीला लागला आणि गाडीवरील अनुराधा आणि मिलिंद खाली पडले.
अनुराधा ही जेसीबीच्या मागील चाकाखाली आल्याने चिरडली गेली. फुलेवाडी येथे राहणाऱ्या अनुराधा या कोल्हापुरातील सूर्या हॉस्पिटल मध्ये काम करत होत्या. अपघात झाल्यावर अनुराधा यांना लगेच ट्रीटमेंट करण्यासाठी CRP घेऊन गेले परंतु डॉक्टरांनी उपचार करण्या अगोदर च त्यांनी जीव सोडला होता.
या घटनेची माहिती मिळताच अनुराधा या काम करत असलेल्या सूर्या हॉस्पिटल मधील सर्व कामगार CRP मध्ये अनुराधा यांना पाहण्यासाठी आले. मिलिंद पोतदार हे एका कंपनीमध्ये काम करत होते. या झालेल्या घटनेमध्ये मिलिंद हे थोडेसे जखमी झाले होते. या अपघाताची नोंद जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये केली आहे. झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होताना दिसून येत आहे. कमी रुंदी असणाऱ्या रस्त्यामुळे नागरिकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.