दुःखद: एक चूक झाली आणि डॉक्टर तरुणीला जग सोडून जावं लागलं; वाचून डोळ्यात पाणी येईल

नांदेड : गेले काही दिवसापासून शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे.खून मारामाऱ्या, आत्महत्या, मर्डर यांसारख्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. नांदेड शहरा लगत असलेले महिपाल पिंपरी या गावात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कुटुंबातील व्यक्तीनीं खून करून मुलीला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना 26 जानेवारी रोजी उघडकीस आली. डॉक्टर विभागात अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या मुलीचे प्रेमप्रकरण गावामधील मुलासोबत होते. हे प्रेम कुटुंबात असणाऱ्या व्यक्तींना .मान्य नसल्यामुळे घरच्याच लोकांनी या मुलीचा रुमालाने गळा दाबून खून केला.त्यांनतर खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात घेऊन गेले.
शेतात मृतदेह पूर्णपणे जाळून टाकण्यात आला. नंतर राख आणि असती जवळच असलेल्या गोदावरी नदीत फेकून देण्यात आले. हा खून एका नवीन आलेल्या फोनवरून उघडकीस आला. विजेच्या धक्क्याने खून झाला आहे असा बनाव केला होता. पोलिसांनी या खुणा बद्दल भाऊ वडील आणि मामा सोबत पाच जणांना अटक केलेले आहे.
शुभांगी जनार्दन जोगदंड हे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. शुभांगी ही नांदेड मधील आयुर्वेद महाविद्यालयात बी ए एम एस मधील तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होती. गेले काही वर्षापासून तिचे गावातील एका मुलासोबत प्रेम संबंध होते. घरच्यांना तिचे प्रेम प्रकरण मान्य नव्हते.याबाबत तिच्या घरच्यांनी तिची समृद्धी काढली होती.
कुटुंबातील व्यक्तीने तिचे लग्न जुळवले होते. वरकडील लोकांना हे प्रकरण माहीत झाल्यामुळे तिचे लग्न मोडण्यात आले. गावामध्ये बदनामी झाल्याच्या कारणावरून शुभांगीचा 22 जानेवारीच्या रात्री खून करण्यात आला. नंतर त्यात रात्री ज्वारी मध्ये तिला जाळण्यात आले. पहाटेच्या वेळी तिची राख गोदावरी नदीत फेकून देण्यात आली. शुभांगी चा खून केल्यानंतर आरोपी हे गावात बिनधास्तपणे हिंडत होते. त्यांची नेहमीची कामे सुरळीत चालू होती.
लेकीचा खून करत असताना हात थर थर कापू नये यासाठी आरोपींनी सर्वांनी दारू पिले होते. ज्या ठिकाणी शुभांगी ला जाळण्यात आले होते त्या जागेवर आरोपींनी पाणी सोडले होते. त्या ठिकाणावर नांगरे फिरवला होता. आरोपींनी पुरावा पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेची माहिती मिळताच महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दुःख आणि संताप व्यक्त केले.सभापती नीलम गोरे यांनी आरोपी बाबत संताप व्यक्त केला. या घटनेमुळे गावातून शुभांगी बद्दल हळहळ व्यक्त होत आहेत तर त्यांच्या कुटुंबाने केलेल्या हत्ते बाबत संताप व्यक्त केला जात आहे.