दुःखद: भावाला वाचवायला गेलेल्या चिमुकलीचा आणि भावाचा सोबतच मृत्यू; वाचून डोळ्यात पाणी येईल

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सख्या भाऊ बहिणीचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रावण आसाराम चव्हाण यांचा मुलगा आणि मुलगी या दोघांचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील सख्ख्या भाऊ बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे गावातील लोकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

आसाराम चव्हाण हे ऊसतोड कामगार आहेत. हे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामधील बोरखेडी पिंगळे या गावातील आहेत. श्रावण आसाराम चव्हाण हे ऊस तोडण्यासाठी करमाळा तालुक्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची दोन छोटी मुले सुद्धा होती. श्रावण आश्रम चव्हाण हा पोट भरण्यासाठी करमाळा तालुक्यात आला परंतु तिथेच त्याच्यावर काळाने घाव घातला. त्याच्या मुलाचा आणि मुलीचा तळ्यात बुडून मृत्यू झाला.

ऊस तोडी कामगारांचे ऊस तोडणी चालू होती. काही कामगार उसाची गाडी भरत होते. हे कामगार उसा ची गाडी भरत असताना त्यांची लहान लहान लेकरे आजूबाजूला खेळत होती. त्या ठिकाणी एक शेततळे होते. लहान लेकर खेळताना त्या तळ्याच्या बाजूला गेली. श्रावण चव्हाण यांची सात वर्षाची मुलगी प्रतीक्षा चव्हाण तळ्यामध्ये पडली.

Advertisement

श्रावणी तळ्यामध्ये पडल्यानंतर तिचा छोटा भाऊ पृथ्वीराज चव्हाण हा सुद्धा तिच्या पाठीमागे गेला आणि तळ्यात पडला. ही घटना घडल्यानंतर बऱ्याच वेळाने ऊस तोडी कामगारांचे लक्षात आले. श्रावण चव्हाण यांनी दोन्ही लेकरांना तळ्यातून बाहेर काढले.परंतु तो पर्यंत उशीर झाला होता. तळ्यात पडलेल्या दोन्ही मुलांचा जीव गेला होता. सख्ख्या भावाचा आणि बहिणीचा तळ्यात पडून मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला होता.

रविवारी दुपारी घटना घडली. बाहेर काढल्यानंतर मुलाला आणि मुलीला करमाळा येथे प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांना दोघांनाही घोषित केले होते. दोघांचेही शव विच्छेदन करून प्रतीक्षा चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे मृतदेह बोरखेडी या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यासाठी घेऊन जाण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे

Advertisement

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *