Track Your Sim: तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत ते कसे पाहायचे? वाचा सविस्तर
Aplya Navavar Kiti Sim card aahet kase check karayache - tafcop dgtelecom gov in

Track Your Sim | सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कायम सतर्क रहायला हवे, दररोज ऑनलाईन फसवणुकीचे अनेक गुन्हे राज्यात तसेच देशात घडत आहेत. याला आपण स्वतः कारणीभूत आहोत. कारण तुमच्या कडून काही चुका होतात. आणि याच चुकांचा फायदा हॅकर्स किंवा फसवणूक करणारे व्यक्ती घेतात आणि तुमची फसवणूक करतात. (How to check which number of sim card active on your name)
आज आम्ही तुम्हाला अशा एका ट्रिक बाबत माहिती देणार आहोत. ही ट्रिक वाचून तुम्ही तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत, ते एका क्लीकवर पाहू शकता. सिमकार्ड घेणं खूप सोप्प आहे. आधार कार्डच्या माध्यमातून सिम कार्ड घेतले जाते. जर तुमच्या कडून तुमचे आधार कार्ड हरवले किंवा तुम्ही कोणाला ते कोणत्याही कारणासाठी दिले आणि त्या व्यक्तीने तुमच्या आधार कार्ड वरून सिम खरेदी करून ते वाईट कामांसाठी वापरले तर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता.
अनेक फसवणूक करणाऱ्या व्यक्ती लोन देतो किंवा एखाद्या योजनेचा फायदा करून देतो. असे बोलून तुमच्या कडून तुमची कागदपत्रे घेतात. आणि याच्या अनेक कॉप्या ते काढून ठेवतात. आणि तुम्हाला काही कारण देऊन तुमचे लोन रद्द झाले आहे. असे सांगतात. त्यामुळे तुम्ही तुमची कागदपत्र परत घेता. मात्र त्यांनी तुमची कागदपत्रे कॉपी करून ठेवलेली असतात.
आणि त्यानंतर काही ट्रिक्स वापरून ते तुमचे बँक खाते खाली करतात. तर काही तुमच्या नावावर सिमकार्ड घेऊन त्या सिम कार्ड चां वापर वाईट कामांसाठी करतात. यामुळे तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सिमकार्ड तुमच्या नावावर असल्यामुळे गुन्हा तुमच्या नावावर दाखल होतो. Aano यातच तुम्हाला मोठ्या अडचणीत येतात. यासाठी आज आम्ही जी माहिती दिली आहे त्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या नावावर असलेली बोगस सिमकार्ड बंद करू शकता.
असे पाहा तुमच्या नावावर असलेली सिमकार्ड? (See the sim card in your name?)
- तुमच्या मोबाइलचे किंवा कॉम्प्युटरचे ब्राऊझर ओपन करा.
- त्यानंतर खालील वेबसाईट वर क्लिक करा.
-
https://tafcop.dgtelecom.gov.in/ - त्याठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका, जो आधार कार्डला लिंक आहे तो.
- आणि Request Otp या बटणावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक Otp येईल तो तेथे टाका.
- आणि Validate या बटणावर क्लिक करा.
- तुमच्या नावावर असलेली सर्व सिमकार्ड तुम्हाला दिसतील.
सिमकार्ड बंद कसे करावे? (how to deactivate sim card if any unknown user use it) – जर तुमच्या नावावर असलेलं सिमकार्ड इतर कोणी व्यक्ती वापरत असेल तर तुम्ही लगेच तुमच्या सिमकार्ड कंपनीला फोन लावून त्यांना ते सिमकार्ड बंद करायला सांगा. कंपनी लगेच सिमकार्ड बंद करेल.