टायटॅनिक चित्रपटात मुख्य भूमिकेत काम केलेल्या अभिनेत्याचे निधन; हॉलिवुडवर शोककळा

दिल्ली | ‘टायटॅनिक’ आणि ‘द ओमान’ सारख्या अनेक चित्रपटांचा भाग असलेले लोकप्रिय अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचे निधन झाले. 80 वर्षीय डेव्हिड वॉर्नर काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. डेव्हिड वॉर्नर यांनी ‘टायटॅनिक’मध्ये स्पायसर लव्हजॉयची भूमिका साकारली होती.
त्यांच्या निधनाविषयी कुटुंबीयांनी सांगितले की, डेव्हिड वॉर्नर यांचे रविवारी, 24 जुलै रोजी लंडनमध्ये कर्करोगामुळे निधन झाले. डेव्हिड वॉर्नर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी लिसा, मुलगा ल्यूक आणि सून, पहिली पत्नी हॅरिएट इव्हान्स असा परिवार आहे. त्यांची दोन लग्न झाली होती.
डेविड हे खूप दयाळू आणि नम्र होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब दुःखात विलीन झाले आहे. मात्र त्यांच्या अभिनयामुळे ते नेहमी सगळ्यांच्या मनात राहतील. डेव्हिड वॉर्नर यांनी आपले शेवटचे दिवस डॅनविले हिल, लंडन येथे घालवले.
चित्रपटांमध्ये डेव्हिड वॉर्नर बहुतेक खलनायकाच्या भूमिकेत दिसले. साल 1941 मध्ये मँचेस्टरमध्ये डेव्हिड वॉर्नरन त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी ‘लिटिल माल्कम’, ‘ट्रॉन’, ‘टाइम बॅंडिट्स’, ‘स्टार ट्रेक’ आणि ‘द फ्रेंच लिटल वुमन’ यासह अनेक चित्रपट गाजवले आहेत. ते 70 आणि 80 च्या दशकातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक होते.
डेव्हिड वॉर्नर यांनी रॉयल शेक्सपियर कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले. राजा हेन्री सहावा आणि किंग रिचर्ड 2 ची भूमिका करून ते नावारूपाला आले होते. त्यांनी साल 1965 मध्ये शेक्सपियरसाठी हॅम्लेटची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला खूप पसंती मिळाली होती. साल 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या मॉर्गन: अ सुटेबल केस फॉर ट्रीटमेंट या चित्रपटासाठी ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारासाठी त्यांना नामांकन देखील मिळाले होते. 1981 मध्ये, डेव्हिड यांनी टीव्ही मिनी-सिरीज साठी एमी अवॉर्ड देखील जिंकला होता.