सरपण आणण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू; घटनेनं सोलापूर हादरलं

सोलापूर | जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चुलीसाठी सरपन वेचून आणण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. घटनेनं तालुक्या सहित पूर्ण जिल्ह्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी या गावात सानिका गरड, पूजा गरड, आकांशा वडजे आणि विशाखा वडजे या चार मुली चूल पेटवण्यासाठी सरपन आणण्यासाठी गेल्या होत्या, यावेळी त्यांना तहान लागली. बाजूला असलेल्या एका शेततळ्यात त्यातील तीन मुली उतरल्या.

 

Advertisement

आणि पाय घसरून त्या शेततळ्यात पडल्या, त्यातील विशाखा ही वर असल्यामुळे तिला काही झाले नाही. मात्र तीन मुलींचा शेत तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे पूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Advertisement

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *