हजारो लोकांनी मदत केली मात्र पुनम नाही वाचली; पुनमच्या निधनाने सर्वत्र शोककळा

जळगाव : गेले बऱ्याच दिवसापासून रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. या होणाऱ्या अपघातामुळे शासनाकडून वेळोवेळी जागृतीही करण्यात येते. एखाद्याच्या छोट्याश्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीला विनाकारण आपला जीव गमवावा लागतो. अशीच एक जळगाव जिल्ह्यात अपघाताची घटना घडली.

 

काही कामानिमित्ताने महामार्गावरून जात असताना दुचाकी घसरून खाली पडल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. डोक्याला गंभीर मार बसल्याने हॉस्पिटलमध्ये तब्बल चार दिवस या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू होती. परंतु तरुणीची ही झुंज अपयशी ठरली. तरुणीवर उपचार चालू असताना शनिवारी रात्री तिचा मृत्यू झाला. या अपघातात मृत पावलेल्या तरुणीचं नाव पूनम सुनील विसपुते (वय. २७, रा.आशाबाबानगर) असं नाव आहे.

Advertisement

 

मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील आशाबाबा नगर या ठिकाणी पूनम विसपूते ही तरूणी आपल्या परिवारासह राहत होती. पूनम ही जळगाव मधील एका खासगी जीममध्ये सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. शहरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून गेल्या काही महिन्यांपासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलं आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर रस्त्याचं काम चालू असून, याच खोदकामाच्या ठिकाणी मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पूनम विसपुते ही आपल्या दुचाकीने जात असताना पूनमची दुचाकी घसरुन ती रस्त्यावर पडली होती.

Advertisement

 

या झालेल्या दुर्घटनेत पूनम विसपुते गंभीर जखमी झाली होती. पूनमच्या डोक्याला गंभीर मार बसला होता. यावेळी पूनमचा जीममधील सहकारी लोकेश बारसे या ठिकाणापासून जात होता. पुनमचा अपघात झाल्याने त्याठिकाणी त्याला गर्दी झाल्याचे दिसले. त्यानंतर लोकेशने तेथे जाऊन चौकशी केल्यावर जखमी तरुणी ही तो काम करत असलेल्या जीममधील सेल्स मॅनेजर आहे हे समजले. लोकेशने पूनमला तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

 

पूनमच्या उपचाराच्या आर्थिक मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन केले होते. पूनमची घरची परिस्थिती गरिबीची आहे. पूनमचे वडील सुनील विसपुते हे सुरक्षारक्षकची नोकरी करतात, तर पूनम चा भाऊ हितेश हा कुरिअर कंपनीत काम करत आहे. पूनमच्या डोक्याला दुखापत झाली असल्याने तिच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज होती. त्यामुळे पूनमच्या मित्र परिवार बरोबरच इतरांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून पूनमवर उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

 

पूनमच्या उपचारासाठी एकीकडे आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे पूनम हिची मृत्यू बरोबर झुंज होती. मात्रसुरू असलेली झुंज शनिवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू होऊन अपयशी ठरली. पूनमच्या झालेल्या अपघातातील मृत्युमुळे कुटुंबाबरोबर तिच्या मित्र परिवाराला धक्का बसला आहे. पूनमच्या कुटुंबियांचा हॉस्पिटल मधील आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. मृत पूनम विसपुतेच्या पश्चात तिचे वडील, भाऊ आणि मोठी बहिण असा परिवार आहे. या अपघाताची जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुषार जावरे हे करत आहे. या अपघातामुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *