क्रिकेट विश्वावर शोककळा! दिग्गज भारतीय खेळाडूचे निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई: गेल्या काही दिवसात अभिनय क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रात ही चांगले व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींचे निधन झालेले दिसून येत होते. आता अलिकडीचे क्रिकेट विश्वातील एक दुःखद बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट विराचे मृत्यूशी झुंज देत असताना निधन झाले आहे. क्रिकेट मधील ग्राउंड मध्ये आपल्या बॉलिंग करण्याच्या कौशल्यावर पुढच्या संघाला गार करणारा हा क्रिकेट वीर आज या जगातून नाहीसा झालेला आहे.
हा क्रिकेट विर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलाना त्याच्यावर काळाने झेप घेतली आहे. सिद्धार्थ शर्मा हा हिमाचल प्रदेशातील तरुण आणि अतिशय वेगवान असा अठ्ठावीस वर्षीय गोलंदाज होता. या सिद्धांत शर्माच २८ व्य वर्षी निधन झालं. बडोद्याच्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना सिद्धार्थ शर्मा याने शेवटचा श्वास घेतला.सिद्धार्थ चे आई वडील तसेच कुटुंबातील इतर व्यक्ती हे बाहेरच्या देशात राहत आहेत. सिद्धार्थ चा भाऊ हा कॅनडा मध्ये राहतो. तो भारतात आल्यानंतर सिद्धार्थ शर्मा याला अग्नी देण्यात आला. ही माहिती हिमाचल प्रदेश मधील क्रिकेट संघातील एका मोठ्या अधिकाऱ्याने मिडियाशी बोलताना दिली.
मिळालेल्या माहिती नुसार अवनिष परमार यांनी सांगितले की सिद्धार्थने बुधवारी अखेरचा श्वास घेतला. गेली बरेच दिवस सिद्धार्थ हा व्हेंटिलेटर वर उपचार घेत होता. बदोड्या मध्ये सामना चालू असताना सिद्धार्थ ला उलटी होत होती. त्याच बरोबर सिद्धार्थ याला लघवी करताना सुद्धा त्रास होत होता. या होणाऱ्या त्रासामुळे सिद्धार्थ याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले. परंतु सिद्धार्थ शर्मा ची तब्येत आणखी खराब होऊ लागली. अखेर सिद्धार्थ शर्माचे निधन झाले. या क्रिकेट विरचे निधन झाल्याने हिमाचल प्रदेशातील क्रिकेट संघ दुःखात बुडाला आहे.
आपल्या सोबत असणारा हा सहकारी हरवला म्हणून आता तो आपल्यात नाही ही गोष्ट त्याच्या संघाला मान्य नव्हती, या जवान क्रिकेट विराच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट संघाला धक्काच बसला. गेल्याच महिन्यात बंगाल सोबत झालेल्या सामन्यात त्याने सात विकेट घेतल्या होत्या. या जवान क्रिकेट वीराचे निधन झाल्याने संपूर्ण क्रिकेट विश्व शोककळेत बुडाला आहे. या सिद्धार्थ शर्मा क्रिकेटवीर जवान निधनामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त – हिमाचल चे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सखू यांनी सिद्धार्थच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले की हिमाचल प्रदेश साठी हजारो ट्रॉफी या क्रिकेट विरणे जिंकून आणल्या होत्या. याच्या निधनामुळे मला अत्यंत दुःख होत आहे. ईश्वर सिद्धार्थच्या आत्म्याला शांती देवो. मी शर्मा कुटुंबाच्या दुःखात सामील आहे. या कुटुंबाला दुःखातून बाहेर पडण्याची ताकद मिळो. अस ट्विट देखील त्यांनी केलं. तसेच त्याने सिद्धार्थ शर्मा याला श्रद्धांजली वाहिली.