झी मराठी वरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका होणार कायमची बंद; त्या जागेवर ही नवी मालिका येणार

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून मन उडू उडू झालं ही मलिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने आजवर मोठा चाहता वर्ग मिळवला आहे. मालिकेत दिपू आणि इंद्रा या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. तसेच सोशल मीडियावर आता ही मालिका बंद होणार असल्याच समजत आहे. मालिकेमध्ये इंद्रा ही भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत साकारतो.

 

मालिका बंद होणार असल्याने अजिंक्य सध्या भाऊक झाला आहे. मालिकेतील अनेक कलाकारांबरोबर तो रील व्हिडिओ बनवून पोस्ट करत आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच या मालिकेच्या शेवटच्या भागाचा व्हिडिओ दाखवण्यात आला. या मालिकेमध्ये शेवटच्या भागात इंद्राला बँकेकडून सन्मान सत्कार मिळणार आहे. तरी या सत्कार समारंभाच्या शूटिंगचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

 

या व्हिडिओमध्ये अजिंक्य सांगत आहे की हा आमच्या मालिकेचा शेवटचा व्हिडिओ आहे. लवकरच तुमच्या आवडीची ही मालिका तुमचा निरोप घेत आहे. काही दिवसांपासून मालिकेमध्ये ऋता दुर्गुळे ही अभिनेत्री देखील दिसत नाही. त्यामुळे मालिका बंद होणार हे मात्र नक्की आहे. मालिका बंद होणार असं समजतात मालिकेचे टीआरपी घसरत चालला आहे का? या कारणामुळे मालिका बंद होत आहे का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडत होते.

 

मात्र मन उडू उडू झालं या मालिकेचा टीआरपी हा अजिबात घसरलेला नाही. मालिकेतील कलाकारांच्या काही वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका आटोपत घेत आहे. मालिका बंद होणार असल्याने या मालिकेचे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. दिपू आणि इंद्रा या दोघांच्या जोडीमुळे या मालिकेला बराचसा तरुण प्रेक्षक वर्ग मिळाला होता. त्यामुळे अनेक जण मालिका बंद होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारे विनंती करत आहे. सोशल मीडियावर कमेंट्सचा नुसता पाऊस पडला आहे.

 

अनेक नेटकरांनी कमेंट करत मालिका बंद करू नका असं लिहिलं आहे. यातील काहींनी कमेंट्स करत लिहलंय, “मालिका खूप छान वाटते पाहायला, प्लिज बंद नका करू.” तर दुसऱ्या एकाने लिहलंय, “खूप छान मालिका आहे का इतक्या लवकर बंद होतेय, मालिकेत किती मस्त ट्रॅक सुरु आहे मालिका बंद का करताय?” तर आणखीन एकाने लिहलंय, “मालिकेला टीआरपी असूनही मालिका का बंद केली जात आहे, ही मालिका बंद झाल्यास आम्ही कोणतीच मालिका पाहणार नाही.” अशा अनेक कमेंट्स सध्या सोशल मीडियावर येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button