आत्ताच्या घडामोडी

बॉलीवूडची ही प्रसिध्द अभिनेत्री ब्रावोवर करत होती जीवापाड प्रेम

दिल्ली | अनेक क्रिकेटर्सचे बॉलीवूड मधील अभिनेत्रींबरोबर प्रेम संबंध राहिले आहेत. यातील अनेक जोड्यांच्या प्रेम कहाण्या सक्सेसफुल देखील झाले आहेत. मात्र बऱ्याच कहाण्या प्रेमानंतर पुढे जाऊ शकल्या नाहीत. अशात भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटूंचे बॉलीवूडमधील अभिनेत्रींबरोबर लग्न झाले आहे. मात्र आपल्या बॉलीवूडमध्ये एक अशी देखील अभिनेत्री आहे जी वेस्ट इंडिजच्या एका क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती. आज ती अभिनेत्री आणि तो परदेशी खेळाडू नेमका आहे तरी कोण याविषयी जाणून घेऊ.

 

वेस्ट इंडिजचा प्रसिद्ध क्रिकेटर ड्वेन ब्राव्हो आणि दृश्यम’ चित्रपटात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका केलेली अभिनेत्री श्रेया सरन हे दोघे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. यांच्या प्रेमाची सुरुवात ही कधी आणि कशी झाली हे माहीत करून घेऊ. वेस्ट इंडिजचा प्रसिद्ध क्रिकेटर ड्वेन ब्राव्हो साल २०१६ मध्ये मुंबईत आला होता.

 

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मासोबत ‘टब बिन 2’ चित्रपटासाठी खास म्युझिक व्हिडिओ शूट करण्यासाठी तो येथे आला होता. त्यावेळी तो एका डान्स रिअॅलिटी शोच्या एपिसोडचे शूटिंग करत होता ज्यामध्ये तो वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून देखील दिसणार होता . दरम्यान, ‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या श्रेया सरनसोबत ब्राव्हो गुप्त डिनर डेट करताना दिसला होता. तेव्हा या दोघांची जोरदार चर्चा सुरू झाली.

 

श्रेया आणि ब्राव्हो मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना मीडियाच्या कॅमेऱ्यांनी तो क्षण टिपला. श्रेया इथे थोडी जागरूक दिसत होती, पण ब्राव्होला पाहून त्याला कोणाचीच पर्वा नाही असे वाटले. त्यावेळी या दोघांच्या प्रेम कहाणीला मोठ उधाण आलं होतं. पुढे जाऊन हे दोघे लग्न करतील असं देखील वाटत होतं मात्र नंतर या दोघांचा ब्रेकअप झाला.

 

अभिनेत्रीच्या कारकिर्दी विषयी सांगायचे झाल्यास तिने हिंदी सह टॉलीवूड आणि हॉलीवुड देखील चांगलं गाजवल आहे. श्रिया सरनने साऊथच्या ‘शिवाजी द बॉस’, कंदास्वामी, टागोर, संतोषम, इष्टम याशिवाय इंग्रजीच्या ‘कुकिंग विथ स्टेला’मध्ये अशा काही दक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button