वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी या प्रसिध्द अभिनेत्रीचे झाले लैंगिक शोषण; तो किस्सा सांगत म्हणाली….

मुंबई | सिक्रेट गेम्स ही वेबसिरीज खूप गाजली. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची दमदार भूमिका पाहायला मिळाली. याच सिरीजमधील कुकू हे पात्र देखील खूप गाजले. हे पात्र अभिनेत्री कुब्रा सैत हिने साकारले होते. या सिरीजमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. अशात आता या अभिनेत्रीने तिच्या वन नाईट स्टँड बद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
नुकतेच कुब्राने ‘ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर’ हे स्वलिखित पुस्तक लॉन्च केले आहे. तिच्या पुस्तकात तिने तिच्या आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट घटनांचा खुलासा केला आहे. यामध्ये तिने तिच्यावर झालेले लैंगिक शोषण आणि इतर अनेक गंभीर गोष्टींचे खुलासे केले आहेत. एका रेस्टॉरंट मालकाने तिचा गैरफायदा घेतला होता.
तसेच वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी तिचे लैंगिक सोषण झाले होते. या सर्वच काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना तिने या पुस्तकात सांगितल्या आहेत. यात एक गंभीर बाब म्हणजे तिला एकदा गर्भपात देखील करावा लागला असल्याचे तिने सांगितले आहे. तिची ही कहाणी वाचून कदाचित तुमची मानसिकता देखील तुम्हाला वेगळा विचार करायला भाग पाडेल.
साल २०१३ मध्ये ती अंदमानला फिरायला गेली होती. त्यावेळी ती ३० वर्षांची होती. इथे आल्यावर तिने स्कुबा डायव्हिंग केलं. नंतर ती काही ड्रिंक घेऊन हॉटेलमध्ये तिच्या मित्रा बरोबर गेली. यावेळी या दोघांनी वन नाईट स्टँड केली. तेव्हा काही दिवसांनी ती प्रेग्नेंट असल्याचं तिला समजलं. त्यावेळी ती हे मुलं सांभाळण्यास तयार नव्हती त्यामुळे तिने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला.
अशात या सर्व गोष्टींचा तिला अजिबात पश्चाताप झाला नाही असेही तिने यात लिहिले. तिचे असे म्हणणे आहे की, २३ व्या वयात लग्न करून ३० पर्यंत मुलं जन्माला घातलेच पाहिजे अशी काहींची मानसिकता आहे. मात्र हे खूप चुकीचे आहे. लोकांनी स्वतःचे मत बदलले पाहिजे. मूल जन्माला घालण्याची पद्धत बदलली पाहिजे. ही अभिनेत्री सलमान खानच्या रेडी या चित्रपटातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली. त्यानंतर तिने काही छोट्या मोठ्या भूमिका केल्या मात्र सिक्रेट गेम्स ही सिरीज तिच्या अभिनयातील कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली.