ट्रेनमध्ये लिपस्टिक, नेलपेंट विकायची ही मराठी अभिनेत्री; आता आहे करोडपती

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार मोठ्या स्ट्रगलने पुढे आले आहेत. चित्रपट सृष्टीत नाव कमवायचे म्हणलं की कलाकारांना मुंबई गाठावी लागायची. आणि त्याठिकाणी जाऊन काही तरी काम करावं लागतं आणि मग तिथून पुढे हळूहळू करिअरची सुरुवात होते. अशा परिस्थितीतून अनेक कलाकार आज नाव कमवून बसले आहेत.
अशीच एक दिग्गज मराठी अभिनेत्री या प्रवाहातून आली आहे. फू बाई फू, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री विशाखा सुभेदार तुम्हाला माहित असेल. एका कार्यक्रमात तिने तिची स्ट्रगल स्टोरी सांगितली आहे. लहान पणापासून तिला कला विश्वाचे फार वेड होते.
अभिनय क्षेत्रात नाव कमविण्याच्या आधी तिने चालत्या रेल्वेत, लिपस्टिक, नेलपेंट आणि कपडे विकून उपजीविका भागवली आहे. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे तिला अशी काम करून आपली उपजीविका भागवायची. हे काम ती शाळा शिकत शिकत करत होती. त्यानंतर विषाखाने शिक्षिका म्हणून देखील काम पाहिले.
एवढंच नाही तर तिने आकाशवाणी मध्ये देखील कला सादर केली. अशा अनेक प्रसंगांतून पुढे येत तिने कला विश्वास पाऊल टाकले आणि छोट्या पडद्यावर काम करून आज ती घराघरात पोहचली आहे. शून्यातून आलेली अभिनेत्री आज अभिनयासाठी लाखोंमध्ये मानधन घेते.