३० वर्ष होऊनही ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींनी केलं नाही लग्न, ४ नंबरची तर….

मुंबई | पूर्वीच्या काळी मुलगी एकदा वयात आली की लगेचच तिचं लग्न लावून दिलं जातं होतं. मात्र आता तस होत नाही. मुलगी शिकते आणि स्वतःच्या भवितव्याची काळजी देखील घेते. अशात मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्री अजूनही अविवाहित आहेत. त्या आपल्या करिअर कडे अधिक लक्ष देत आहेत. या बातमीतून अशाच काही अभिनेत्रींची माहिती घेणार आहोत.
• प्राजक्ता माळी
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या रान बाजार या सिरीज मुळे प्राजक्ता खूप चर्चेत आली होती. यावेळी तिला अनेकजण ट्रोल देखील करत होते. मात्र तिने तिच्या अभिनयाने या सर्वांची बोलती बंद केली. अशात प्राजक्ता आता ३२ वर्षांची झाली आहे. ८ ऑगस्ट १९८९ चा तिचा जन्म आहे. मात्र अद्याप तिने लग्नाचा कोणताही विचार केलेला नाही.
• गौतमी देशपांडे
गौतमी ही मृण्मयी देशपांडे या अभिनेत्रीची छोटी बहिण आहे. ती देखील अभिनयात सक्रिय आहे. तिने काही मालिकांमध्ये आता पर्यंत काम केले आहे. गौतमीचा जन्म ३१ जानेवारी १९९२ रोजी झाला आता ती ३० वर्षांची आहे.
• मुक्ता बर्वे
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीमध्ये मुक्ता बर्वे हे नाव आग्रहाने घेतले पाहिजे. तिने आजवर अनेक यशस्वी आणि हिट चित्रपट केले आहेत. नुकताच तिचा वाय हा चित्रपट प्रदर्शित झाला. तिचा जन्म १७ मे १९७९ चा आहे. तसेच आता तिचे वय ४३ वर्षे आहे.
• श्रिया पिळगावकर
सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया ही देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. तिने काही चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. तिचा जन्म २३ एप्रिल १९८९ रोजी झाला. आता ती ३३ व्या वयात पोहचली आहे.
• शर्मिला शिंदे
शर्मिला शिंदे ही देखील मराठी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिच्या अनेक मालिका हिट राहिल्या आहेत. तिचा जन्म ५ एप्रिल १९८७ रोजी झाला असून आता ती ३५ वर्षांची आहे.
• जुई गडकरी
पुढचं पाऊल या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री जुई गडकरी ही आता ३४ वर्षांची आहे. मात्र अजून तिला हवा तसा जोडीदार मिळालेला नाही. ८ जुलै १९८८ ही तिची जन्म तारीख आहे.
• सुरुची अडवकर
सुरुची देखील मालिका विश्वात सक्रिय आहे. दमदार अभिनयाने ती खूप प्रसिद्ध झाली आहे. तिची जन्म तारीख २३ एप्रिल १९८८ असून आता ती ३४ वर्षांची आहे.
तर या होत्या मराठी सिनेसृष्टीतील काही अभिनेत्री ज्या वयाची ३० शी ओलांडली असून देखील अजून सिंगल आहेत.